एक्स्प्लोर

Four Labour Codes : भारतात आजपासून चार नवे लेबर कोड लागू, केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांची घोषणा, काय बदल होणार जाणून घ्या?

New Labour Codes : केंद्र सरकारनं आजपासून देशात नव्या श्रम संहिता लागू केल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांनी याबाबत घोषणा केली.

नवी दिल्ली : केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नव्या श्रम संहिता लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या चार श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 याचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 29 कायद्यांमध्ये सुधारणांसाठी या संहिता लागू करण्यात आल्या आहेत. नव्या लेबर कोडमुळं आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल सोपी होईल, असं सांगण्यात आलं आहे.

New Labour Code : नव्या लेबर कोडमुळं काय फायदा होणार?

केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीय यांच्या पोस्टनुसार सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी मिळणार आहे. युवकांना नियुक्ती पत्र मिळण्याची हमी मिळेल. महिलांना देखील समान कामासाठी समान वेतन आणि सन्मानाची हमी, 40 कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी मिळेल. निश्चित कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या कालावधीनंतर ग्रॅच्युईटीची गॅरंटी मिळेल. 40 वर्षांच्यावरील श्रमिकांना दरवर्षी मोफत आरोग्य तपासणीची गॅरंटी मिळेल. ओव्हरटाईम केल्यास दुप्पट वेतनाची गॅरंटी, जोखीम असलेल्या क्षेत्रातील कामगारांना 100 टक्के आरोग्य सुरक्षेची गॅरंटी, आंतरराष्ट्रीय मानकांनुसार श्रमिकांना सामाजिक न्यायाची गॅरंटी मिळेल, असं मनसूख मांडवीय यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मनसूख मांडवीय पुढं म्हणाले हे बदल नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रमिकांच्या कल्याणासाठी घेतलेला ऐतिहासिक निर्णय आहे. नव्या सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून विकसित भारत 2047 चं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल, असं मनसूख मांडवीय म्हणाले.

भारतातील अनेक कामगार कायदे स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजेच 1930 ते 1950 च्या काळातील आहेत. अर्थव्यवस्था आणि जग बदललं आहे. जगातील अनेक अर्थव्यवस्था अपडेट झाल्या असून त्यांनी अलीकडच्या दशकात लेबर रेग्युलेशन्स केल्या आहेत. भारतात तुटक, किचकट, कालबाह्य तरतुदी असणारे 29 केंद्रीय कायदे होते. नव्या चार लेबर कोडची अंमलबजावणी आधुनिक जागतिक ट्रेंडसशी जोडून घेणार आहेत. या नव्या कोडमुळं कामगार आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळेल असं सांगण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates: अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
अमेरिकेच्या एका निर्णयानंतर सोने-चांदी बाजारात मोठे बदल; भारतातील सराफा बाजारांत अस्थिरता, आजचे दर किती?
Karj Mafi : कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 16 लाख 96 शेतकऱ्यांची यादी जाहीर, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवण्यासाठी दोन महत्त्वाची कामं करावी लागणार 
कर्जमाफीची 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर, ॲग्रीस्टॅकवर नोंदणी,आधार प्रमाणीकरण करावं लागणार
Rule Change : एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
एलपीजी दर, तात्काळ तिकीट बुकिंग ते आयटीआर फायलिंग, 1 ऑगस्टपासून कोणते नियम बदलणार? 
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहि‍णींची अंतिम आकडेवारी समोर, 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र
लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी महिला पात्र, 66 लाख महिला ई-केवायसी न केल्यानं अपात्र, आकडेवारी समोर

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
Embed widget