Gold Silver Rate: दिलासादायक! सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, जाणून घ्या महत्वाच्या शहरातील दर
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) आज पुन्हा घसरण झाली आहे.

Gold Silver Rate: सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) आज पुन्हा घसरण झाली आहे. आज सोन्याचे दर हे 10 ग्रॅमसाठी 59 हजार 68 रुपये होते. कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात 0.57 टक्क्यांची घट झाली आहे. काल सोन्याचे दर हे 10 ग्रॅमसाठी 59 हजार 405 रुपये होते. त्यामध्ये आज 337 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. जाणून घेऊयात प्रमुख शहरामधील सोन्या चांदीचे आजचे दर
चांदीच्या दरात 730 रुपयांची घसरण
सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून आले. वायदा बाजारात चांदीचा भाव 72 हजार 970 रुपये प्रति किलो होता. कालच्या तुलनेत हा दर कमी झाला आहे. तर दुसरीकडे आड चांदीचा दर हा 72,500 रुपये प्रति किलोवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरा तघसरण झाली आहे. काल चांदीचा दर हा 73 हजार 230 रुपये प्रति किलो होता. आज चांदीच्या दारत 730 रुपयांची घसरण झाली आहे.
प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
दिल्ली- 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
कोलकाता - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलो
मुंबई - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
चेन्नई - 24 कॅरेट सोने 60,330 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 78,000 रुपये प्रति किलोग्रॅम
हैदराबाद - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 78,000 रुपये प्रति किलोग्रॅम
अहमदाबाद - 24 कॅरेट सोने 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
जयपूर - 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
लखनौ - 24 कॅरेट सोने 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
पाटणा - 24 कॅरेट सोने 60,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलोग्रॅम
पुणे - 24 कॅरेट सोने 60,050 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 74,500 रुपये प्रति किलो
महत्त्वाच्या बातम्या:
Gold Smuggling Case : नागपूर विमानतळावर 87 लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक, कस्टम विभागाची मोठी कारवाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
