एक्स्प्लोर

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात घसरण, कोणत्या शहरात किती दर? जाणून घ्या सविस्तर माहिती 

सोन्या चांदीची (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज (17 जुलै)  गुरुवारी देशात सोन्याच्या किंमती घसरण झाली आहे.

Gold Silver Rate : सोन्या चांदीची (Gold Silver Rate) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज (17 जुलै)  गुरुवारी देशात सोन्याच्या किंमती घसरण झाली आहे. आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90990 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 99270 रुपये आहे. 100 रुपयांच्या घसरणीसह, चांदीचा भावही 113900 रुपये प्रति किलोवर आला आहे.

कोणत्या शहरात सोन्याचा किती दर?

मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरु आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 90990 रुपये दराने विकले जात आहे. त्याच वेळी, येथे 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 99270 रुपये आहे. अहमदाबाद आणि पटना येथे सोन्याचा दर आज सारखाच आहे. येथे 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत अनुक्रमे 91100 रुपये आणि 99380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जयपूरमध्ये, प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 91150 रुपये आहे, तर त्याच ग्रॅमच्या 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 99480 रुपये आहे.

सोन्याच्या आयातीत घट

 जूनमध्ये भारताची सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी घसरून दोन वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमी पातळीवर पोहोचली आहे. किमतींमध्ये झालेल्या विक्रमी वाढीमुळे मागणीत घट झाली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेल्या भारताची आयात 21 टनांवर घसरली आहे, जी एप्रिल 2023 नंतरची सर्वात कमी आहे. जूनमध्ये सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या 2.48 अब्ज डॉलर्सवरून 1.84 अब्ज डॉलर्सवर आली आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने जूनमध्ये सरासरी 52.4 टन सोने आयात केले आहे. व्यापार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत भारताची सोन्याची आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी होऊन 204.01 टन झाली आहे, जी 2020 च्या पहिल्या सहामाहीत कोरोना साथीमुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतरची सर्वात कमी आहे.

सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा

दरम्यान, सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहा.यला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत होती. अनेकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहबे. अशातच आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण झाल्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Gold Rate : पैसे तयार ठेवा, सोन्याच्या दरात मोठी घसरण येण्याची शक्यता, वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टमध्ये दावा

महत्त्वाच्या बातम्या

PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
साखरेच्या दरात वाढ, पण शेतकऱ्यांच्या पदरात काय? बळीराजाला तब्बल 16 हजार 87 कोटींचा फटका, वाचा नेमकं प्रकरण काय?
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्याचा नियम बदलला, मोफत व्यवहारांनंतर 15 रुपये शुल्क घेणार, 1 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी 
स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, BSBD खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियम बदलला 
Sugar Price Hike: साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं माजी साखर आयुक्तांनी कारण सांगितलं, म्हणाले...
साखर कारखानदारांकडू इथेनॉल निर्मितीला प्राधान्य, नेपाळसह इतर मार्गाने चोरुन साखर विक्री? साखर दरवाढीचं कारण काय? माजी साखर आयुक्त म्हणाले...

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget