एक्स्प्लोर

दिलासादायक! सोन्याच्या दरात घसरण, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती द्यावे लागतात पैसे?  

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरानं आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. मात्र, आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे

Gold Silver Rate : गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरानं आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. मात्र, आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 8667.3 रुपये प्रति ग्रॅम होता, यामध्ये आज 20 रुपयांची घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भावही 20 रुपयांनी घसरुन 7946.3 रुपये प्रति ग्रॅम झाला. मात्र, चांदीच्या दरात कोणताही बदल दिसून आला नाही. 

तुमच्या शहरात 10 ग्रॅम सोन्याची किंमत किती?

 उत्तर भारतातील मोठ्या शहरांमध्ये सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 86673 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला आहे. तर जयपूरमध्ये 86666 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. लखनौ, चंदीगड आणि अमृतसरमध्ये सोन्याचा दर 86689 रुपये, 86682 रुपये आणि 86700 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकला गेला. त्याचवेळी चांदीचे भाव स्थिर राहिले. 

सोन्या-चांदीच्या दरांवर कसा होतोय परिणाम? 

सोन्या-चांदीच्या किमतींवर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभाव असतो. यामध्ये जागतिक मागणी, चलन विनिमय दर, व्याजदर, सरकारी धोरणे आणि आंतरराष्ट्रीय घटनांचा समावेश आहे. विशेषत: यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर लक्षणीय परिणाम होतो. याशिवाय गुंतवणूकदारांची आवड आणि सणासुदीच्या काळात मागणीत झालेली वाढ यांचाही किमतींवर परिणाम होतो.

पुढच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता

येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. डॉलर निर्देशांक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील गुंतवणूकदारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने सोन्याची मागणी वाढू शकते, त्यामुळे किमतीत सुधारणा शक्य आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचा चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना सोनं घेणं परवड नाही. मात्र, दुसऱ्या बाजूला मोठ्या संस्था, श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करताना दिसत आहेत. कारण, सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नागरिकांना फायद्याची ठरत आहे. कारण दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच आहेत. यामुळं सोन्यात केलेली गुंतवणूक फायद्याची ठरत आहे. दुसऱ्या बाजदुला सर्वसामान्य लोकांना सोन्याची खरेदी करणं शक्य नाही. त्यामुळं सोन्याच्या किंमती कधी कमी होणार असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

सोन्या चांदीचे दर विक्रमी पातळीवर, खरेदीदारांना मोठा दणका, 10 ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागतात 'एवढे' पैसे

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
E100 Flex Fuel Vehicles : E100 इंधनाला मंजुरी, वाहनावर काय परिणाम?
E100 Flex Fuel Vehicles : E100 इंधनाला मंजुरी, वाहनावर काय परिणाम?
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, नव्या आठवड्यात दमदार सुरुवात, गुंतवणूकदारांवर दिवाळीपूर्वी पैशांचा पाऊस, 3 लाख कोटी कमावले...
शेअर बाजारात नव्या आठवड्यात दमदार सुरुवात, गुंतवणूकदारांवर दिवाळीपूर्वी पैशांचा पाऊस, 3 लाख कोटी कमावले...
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा
दुबईतील 1 कोटीची नोकरी सोडली, भारतात सुरु केलं स्टार्टअप, आता वर्षाला मिळवतेय 2 कोटी 20 लाख, वाचा जिद्दी तरुणीची यशोगाथा

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Embed widget