एक्स्प्लोर

Gold Silver Price Today : चांदी सत्तर हजारांच्या आत, दरात 1000 रुपयांची घसरण, सोने 'जैसे थे'

चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. दोन दिवसांत चांदीच्या दरात 1600 रुपयांची घसरण झाली असून चांदी आता सत्तर हजारांच्या आत आली आहे.

मुंबई : सातत्याने बदल होत असलेल्या चांदीच्या भावात आज सलग दुसऱ्यांदा मोठी घट झाली आहे. गुरुवारी बाजार बंद होतांना चांदीच्या भावात 1000 रुपयांची घट झाल्याचं पहायला मिळतंय. आता एक किलो चांदीसाठी 69,000 रुपये इतकी किंमत मोजावी लागणार आहे. तुलनेत सोन्याच्या भावात कोणताही बदल झाला नाही. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,980 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,980 रुपये इतका आहे. 

दोन दिवसांचा अपवाद वगळता सोन्याच्या किंमती स्थिर झाल्याचं दिसून येतंय. सोन्याच्या किंमतीत मंगळवारी 120 रुपयांची तर बुधवारी 320 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. 

गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.

चांदीची किंमत सत्तर हजारांच्या आत
गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीमध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली आहे. 30 जून रोजी चांदीमध्ये 400 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 1 जुलैला 1100 रुपये, 3 जुलैला 700 रुपये, 5 जुलैला 1200 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वी 6 जुलैला चांदीमध्ये 200 रुपयांची वाढ झाली तर बुधवारी त्यामध्ये 600 रुपयांची घट झाल्याची पहायला मिळालंय. आता पुन्हा एकदा चांदीच्या दरात 1000 रुपयांची घट झाली आहे. 

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : कालच्या धक्क्यानंतर आज शेअर बाजार सावरला, एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई,कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक,एका दिवसात गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई, कोणत्या शेअरमध्ये तेजी?
Mutual Fund Update : सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
सेक्टोरल म्युच्युअल फंडांची धूम! 'या' वित्तीय सेवा फंडांनी एका वर्षात दिला बंपर परतावा; पाहा टॉप 5 फंड
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget