मुंबई : भारतात सध्या सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव गगनाला भिडल्यामुळे सामन्यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर कमी झाला आहे. असे असले तरी अजूनही सोने प्रति 10 ग्रॅम 71 हजार रुपये झाले आहे. भारतात सणांच्या पार्श्वभूमीवर सोने हा धातू मोठ्या प्रमाणात खरेदी केला जातो. भारतात सोन्याची आभूषणं परिधान करण्याची मोठी परंपरा आहे. दरम्यान जगात सर्वांधिक सोने (Gold Reserve) कोणत्या देशाकडे आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? देशात चुकून अस्थिरता निर्माण झाल्यावर हेच सोन्याचे भांडार कामाला येते. जमा केलेले सोने विकून सरकार देशात पुन्हा एकदा स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे जगातील वेगवेगळ्या देशांची सरकारे सोने खरेदी करून ते आपल्या तिजोरीत ठेवतात.  


जगात सर्वाधिक सोने कोणत्या देशाकडे आहे? (Gold Reserves In India)


जगात सर्वाधिक सोने हे अमेरिका देशाकडे आहे. सोने साठवणुकीच्या बाबतीत अमेरिकेच्या कोणी आसपासदेखील नाही. या देशाकडे एकूण 8133 टन सोनं आहे. अमेरिकेनंतर जर्मनी या युरोपीयन देशाचा क्रमांक येतो. जर्मनीच्या केंद्रीय बँकेकडे 3367 टन सोने आहे. अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण फारच कमी आहे. जर्मनीनंतर तिसऱ्या क्रमांकावर इटली या देशाचा नंबर लागतो. इटलीजवळ 2452 टन सोने आहे. फ्रान्सजवळ 2436.06 टन, रशियाजवळ 2333 टन, चीनजवळ 2192 टन, स्वीत्झर्लंडजवळ 1040 टन सोनं आहे.  त्यानंतर जपानचा क्रमांक येतो. जपानकडे 847 टन सोने आहे.


भारताकडे किती सोनं आहे? (Gold Reserve in India)


सोने या धातुची खरेदी करण्यासाठी भारत आणि चीन हे नेहमीच पुढे असतात. सोन्याची सर्वाधिक उलाढाल ही चीनमध्ये होते. त्यानंतर भारताच क्रमांक येतो. सोन्याच्या भांडारामध्ये भारताचा टॉप10 देशांत समावेश होतो. भारताजवळ 801 टन सोने आहे. भारताचा सोने भांडाराच्या बाबतीत नववा क्रमांक येतो. या सरकारी खजान्याव्यतिरिक्त भारतातील लोकांकडे एकूण 25 हजार टन सोने आहे. सोने भांडाराच्या बाबतीत नेदरलँड, टर्की, तैवान, उझबेकिस्तान या देशांचा क्रमांक येतो.


हेही वाचा :


चिंता सोडा! तज्ज्ञांनी सांगितलेले 'या' सहा कंपन्यांचे शेअर खरेदी करा अन् व्हा मालामाल!


'या' शेअर गडगडला अन् रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत तब्बल कंपनीचा 1170 कोटींची घट!


'हे' पाच स्टॉक घ्या अन् खोऱ्याने पैसे ओढा, वर्षभरासाठी होल्ड केल्यास होऊ शकता मालामाल!