मुंबई : आज अमेरिकेतील शेअर बाजारात (Share Market) चांगली तेजी पाहायला मिळाली. परिणामी भारताच्या शेअर बाजारातही तेजी येण्याची आशा व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास ते फायद्याचे ठरू शकते.  ब्रोकरेज फर्म नुवामा (Nuvama) ने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ शकणाऱ्या काही स्टॉक्सची शिफारस केली आहे. यामध्ये Jupiter Hospitals, Coal India, Ambuja Cements, ACC, Federal Bank या कंपन्यांच्या स्टॉक्सचा समावेश आहे. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला यातून 30 टक्के परतावा मिळू शकतो, असा दावा नुवामाने केला आहे.  

Jupiter Hospitals 

नुवामाने Jupiter Hospitals चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा शेअर खरेदी करत असाल तर टार्गेट 1,585 रुपये प्रति शेअर ठेवावे. 3 मे 2024  रोजी या शेअरचा भाव 1214 रुपये होता. दीर्घकालन गुंतवणूक केल्यास तुम्हाला हा स्टॉक 30 टक्क्यांनी रिटर्न्स देऊ शकतो.

Coal India

Coal India या कंपनीचे स्टॉकदेखील खरेदी करण्याचा सल्ला Nuvama ने दिला आहे. या कंपनीच्या शेअरसाठी टार्गेट प्राईस 537 रुपये ठेवावे. 3 मे 2024 रोजी या शेअरचा भाव 475 रुपये होता.  या स्टॉकमध्ये वर्षभरासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 13 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असे नुवामाने सांगितले आहे. 

Ambuja Cements

नुवामाने Ambuja Cements या कंपनीचे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट 767 रुपये प्रति शेअर ठेवावे. 3 मे 2024  रोजी या शेअरचा भाव 621 रुपये होता. वर्षभरासाठी या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 23 टक्के रिटर्न्स मिळू शकतात. 

ACC

ACC कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला Nuvama ने दिलाय. या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असाल तर टार्गेट प्राईज 3119 रुपये प्रति शेअर ठेवायला हवी, असं नुवामाने सांगितलंय. 3 मे 2024 रोजी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 2530 रुपये होते. वर्षभरासाठी या कंपनीचे शेअर्स होल्ड केल्यास तुम्हाला 23 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असा दावा नुवामान केला आहे. 

Federal Bank

Federal Bank चे स्टॉक खरेदी करून टार्गेट प्राईज 195 रुपये प्रति शेअर ठेवावे असे नुवामाने म्हटले आहे. 3 मे 2024 रोजी या शेअरचे मूल्य 165 रुपये होते. गुंतवणूक करून तुम्ही हे शेअर वर्षभर होल्ड केल्यास तुम्हाला 18 टक्के रिटर्न्स मिळू शकतात, असा दावा नुवामाने केलाय.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

तुम्हीही 'ड्रीप प्राईसिंग'चे बळी ठरलाय का? जाणून घ्या ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते?

बीएसएनएल कंपनी संकटात? कर्मचाऱ्यांचे थेट केंद्र सरकारला पत्र!