चिंता सोडा! तज्ज्ञांनी सांगितलेले 'या' सहा कंपन्यांचे शेअर खरेदी करा अन् व्हा मालामाल!
भांडवली बाजाराच्या नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या आठवड्यात कोणकोणते स्टॉक्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात, याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुंतवणूकदार तज्ज्ञ राकेश बंसल यांनी ब्रिटानिया या कंपनीच्या शेअरची स्टॉक ऑफ द वीक म्हणून निवड केली आहे. हा शेअर खरेदी करताना 4814 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 4730 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यासह त्यांनी Raillis India हा शेअरदेखील खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. त्यासाठी 287 टार्गेट प्राईस आणि 263 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा असे राकेश बंसल यांनी म्हटले आहे.
मार्केट एक्सपर्ट मेहुल कोठारी यांनीदेखील NHPC कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे . हा शेअर खरेदी करत असाल तर 107 रुपयांचे टार्गेट प्राईस आणि 93 रुपयांचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला मेहुल यांनी दिलाय.
मार्केट एक्सर्प्ट सुमित बगडिया या आठवड्यासाठी Polycab India Ltd या कंपनीच्या स्टॉकची निवड केली आहे. हा शेअर खरेदी करताना 6000 ते 6100 रुपये टार्गेट प्राईस तर 5700 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिलाय.
शेअर बाजार एक्स्पर्ट संदीप जैन खरेदीसाठी अनेक स्टॉक्स सुचवले आहेत. डाबर या कंपनीचा शेअर खरेदी करून 551 रुपये टार्गेट प्राईस ठेवावी तसेच 523 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवावा असा सल्ला जैन यांनी दिला आहे. यासह त्यांनी Pricol हादेखील स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. हा स्टॉक खरेदी करताना 465 किंवा 470 रुपयांची टार्गेट प्राईस आणि 415 रुपयांचा स्टॉप लॉस ठरवला पाहिजे, असे जैन यांनी सुचवले आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)