मुंबई : भांडवली बाजबराच्या पहिल्याच आठवड्यात टाटा उद्योग समुहाचाच्या टायटन या कंपनीचे शेअर (Share Market) चांगलेच गडगडले. या घसरणीमुळे देशभरातील अनेक दिग्गज गुंतवणूकदारांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार टायटन (Titan) या कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजारावर (BSE) या शेअरचे मूल्य हे 3257.05 रुपयांवर आले आहे. याचा परिणाम दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या संपत्तीवर झाला आहे. टायटनचे शेअर्स पडल्यामुळे त्यांची संपत्ती तब्बल 1100 कोटींपेक्षा कमी झाली आहे.


झुनझुनवाला यांचे कोट्यवधी बुडाले


गेल्या आठवड्यात भांडवली बाजार बंद झाला तेव्हा तेव्हा टायटनचे शेअरचे मूल्य हे 3535.40  रुपये होते. मात्र सोमवारी या शेअरमध्ये 248  रुपयांची घट झाली आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन या कंपनीचे 47,483,470 शेअर्स आहेत. या कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची 5.35 टक्के हिस्सेदारी आहे. सोमवारी मात्र या कंपनीचे शेअर्स मूल्य 248 रुपयांपेक्षा अधिक कमी झाले. यामुळे झुनझुनवाला यांची संपत्ती 1170 रुपयांनी घटली.


टायटन या कंपनीची स्थिती काय?


मार्च 2024 च्या तिमाहीत टायटन या कंपनीचा कंसॉलिडेटेड निव्वळ नफा हा वर्षभराच्या आ में टाइटन का कंसॉलिडेटेड नेट प्रॉफिट 771 कोटी रुपये झाला होता. एका वर्षात टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. टायटन कंपनीच्या शेअरचे 52 आठवड्यांतील सर्वांधिक मूल्य हे 3885 रुपये आहे. तर या कंपनीचा 52 आठवड्यातील लो लेव्हल 2656.60 रुपये होता. 


शेअर पडले तरी खरेदी करण्याचा सल्ला


सध्या टायटन कंपनीचा शेअर पडलेला असला तरी गुंतवणूक तज्ज्ञ टायटनचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. ब्रोकरेज हाउस मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसने टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी टार्गेट प्राईज 4100 रुपये ठेवण्याचा सल्लाही या ब्रोकरेज फर्मने दिलाय. ग्लोबल ब्रोकरेज हाउस जेफरीजने टायटनचे शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला असून टार्गेट प्राईज 3500 रुपये दिली आहे.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


'हे' पाच स्टॉक घ्या अन् खोऱ्याने पैसे ओढा, वर्षभरासाठी होल्ड केल्यास होऊ शकता मालामाल!


तुम्हीही 'ड्रीप प्राईसिंग'चे बळी ठरलाय का? जाणून घ्या ग्राहकांची फसवणूक नेमकी कशी होते?


पैसे ठेवा तयार! या आठवड्यात येणार तीन मोठे आयपीओ, भरघोस नफ्याची नामी संधी