Gold Price Today : रशिया युक्रेन तणावाच्या (Russia- ukraine conflicts) पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दरात वाढ होत आहे. परिणामी, सोन्याच्या किमती आणि तेलाच्या किमतींवर याचा फटका बसत आहे. आज भारतातील सोन्याचे दर पाहता किलोमागे 6,600 रुपयांनी वाढ झालीय. भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,000 रुपये आणि 24 कॅरेटचा 51,280 रुपये आहे,. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर
22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई - 47,820 52,170
पुणे - 47,100 51,280
नागपूर 46,950 51,200
नाशिक 47,100 51,300
दिल्ली - 47,000 51,280
कोलकत्ता 47,000 51,280
बॅंगलोर - 47,000 51,280
चेन्नई - 47,820 52,170
अहमदाबाद - 46,900 51,430
लखनऊ - 47,150 51,430
रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक बाजारालाही धक्का
युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. काल सोन्याचा भाव 1 टक्क्यांनी वाढून $1,909.89 प्रति औंस झाला होता. चांदीचा दरही 1 टक्क्यांनी वाढून प्रति औंस 26 डॉलरच्या आसपास पोहोचला होता. रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे सोमवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली दिसत होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. सोन्याच्या दरात 800 रूपयांनी जोरदार वाढ झाली.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine Conflict : हवाई प्रवास महागणार; युक्रेन-रशिया युद्धामुळे हवाई इंधनाच्या किमती विक्रमी पातळीवर
- Russia Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha