Bhuvan Badyakar : सोशल मीडियावर कच्चा बदाम हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत  अनेकांनी  'कच्चा बदाम' गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर केले. कच्चा बदाम गाण्याचे गायक भुवन बडायकर (Bhuvan Badyakar) यांना या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. भुवन यांना सोमवारी रात्री रूग्णालायात दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, भुवन हे सेकंड हँड कार चालवायला शिकत होते. या दरम्यान त्यांची गाडी धडकली. या घटनेत भुवन हे जखमी झाले आहेत. त्यांना पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील एका रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


भुवन हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असं त्यांचे कुटुंब आहे. भुवन हे  कुरलजुरी गावामध्ये कच्चा बदाम म्हणजेच शेंगदाणे विकायचे. शेंगदाण्याला पश्चिम बंगालमध्ये 'कच्चा बदाम' म्हणतात.


व्हायरल झालेलं कच्चा बदाम हे गाणं म्हणत ते शेंगदाणे विकत होते. त्यावेळी एका व्यक्तीनं त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर त्यांचं हे गाणं व्हायरल झालं. आता या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन देखील तयार करण्यात आलं. या रिमिक्स गाण्याला 80 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. 






कच्चा बदाम गाणं व्हायरल झाल्यानंतर  भुवन यांना प्रसिद्ध मिळाली. एका म्यूझिक कंपनीनं त्यांच्या नवीन प्रोजेक्टसाठी भुवन यांची निवड केली आणि काही दिवसांपूर्वी त्यांना तीन लाख रूपयांचा चेक दिला होता. 


महत्वाच्या बातम्या 


Adipurush : महाशिवरात्रीच्या दिवशी प्रभासच्या आदिपुरूषची रिलीज डेट जाहीर; 'या' दिवशी होणार प्रदर्शित


Viral Song : 'बदाम... बदाम... कच्चा बदाम'वर थिरकले सेलिब्रिटी; गाणं सोशल मीडियावर व्हायरल, खरा गायक कोण?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha