Gold Silver Price Today : रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) सध्या सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, आज (गुरुवारी) सर्व प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या (Gold) दरात किंचित वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर प्रति 100 ग्रॅम 10,000 रुपयांनी वाढले आहेत. या वाढीनंतर 22 कॅरेट सोन्याचा दर 47,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 50,090 वर पोहोचला आहे. तर चांदीचे (Silver) दर 0.66 टक्क्यांनी वाढून 68,115 रूपये झाला आहे. 


दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये मौल्यवान धातूचा भाव 47,400 रुपये (22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी) होता. 


जागतिक बाजारपेठेतील सोन्याचे दर : 


जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. स्पॉट सोन्याने 0117 GMT पर्यंत $1,927.18 प्रति औंसवर आपले स्थान ठेवले आहे. सोन्याचे फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी वाढून $1,929.90 वर आले आहे. 


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha