Share Market : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. काही दिवसांपासून घसरण सुरू असलेल्या शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली.  BSE सेन्सेक्स 452 अंकांच्या उसळीसह 55921 वर उघडला. तर, आज निफ्टी 117.20 अंकांनी वधारत 16723 च्या पातळीवर सुरू झाला. 


प्री-ओपनिंगमध्ये बाजार


NSE चा निफ्टी आज 117.20 अंकांच्या चांगल्या वाढीसह 16723 च्या पातळीवर प्री-ओपन ट्रेड करताना दिसला. BSE सेन्सेक्स 452 अंकांच्या उसळीसह 55921 वर ट्रेड करत होता. 


निफ्टी 50 मधील 44 कंपन्यांचे स्टॉक्स वधारले आहेत. तर, 6 शेअर्समध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीदेखील उसळला आहे. बँक निफ्टी हा 35, 574 अंकावर व्यवहार करत आहे. एचडीएफसीच्या शेअर्समध्ये खरेदीचा ट्रेंड दिसून आला.  





कोणत्या इंडेक्समध्ये तेजी?


आयटी, बँकिंग, मेटल, वित्तीय, आरोग्यसेवा, इंधन आणि गॅस, ऑटो या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी दिसून येत आहे. तर, सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ऊर्जा आदी क्षेत्रातील समभाग किंचीत वधारले आहेत. 


कोल इंडियाचा शेअर 4 टक्क्यांनी वधारला आहे. IOC 3.70 टक्के आणि ONGC 2.45 टक्क्यांनी वधारला. तर, बीपीसीएल आणि विप्रोमध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. 


कच्च्या तेलाच्या दरात वाढ


रशिया-युक्रेनच्या युद्धाची झळ जगाला बसण्यास सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या दराने आता मागील 9 वर्षातील उच्चांक मोडला आहे. फेब्रुवारी 2013 नंतर पहिल्यांदाच ब्रेंट क्रू़ड ऑइल दराने 118 डॉलर प्रति बॅरल इतका दर गाठला आहे. युक्रेनवर रशियाने हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. अमेरिका आणि अन्य देशांनी राखीव तेल साठ्यातून कच्च्या तेलाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर उच्चांक गाठत आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha