Gold Rate Today : आज आठवड्यातला पहिला दिवस म्हणजेच सोमवार. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) दिवसेंदिवस वाढ होतेय. सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहे. याचं कारण म्हणजे जेव्हापासून अमेरिकन मध्यवर्ती बॅंकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली तेव्हापासून डॉलर मजबूत झाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 57,280 रुपये तर एक किलो चांदीचा दर 68,820 रूपये आहे. 

या संदर्भात कॉलिन शाह, एमडी, कामा ज्वेलरी (Mr. Colin Shah, MD, Kama Jewelry) म्हणतात की, "2022 मध्ये दुहेरी अंकी परतावा दिल्यानंतर सोने 2023 मध्ये देखील तेच करण्यास तयार दिसत आहे. एकट्या जानेवारी महिन्यात सोन्याच्या किमती जवळपास चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये सोन्याच्या किमती आपल्या नीचांकी पातळीपासून प्रति तोळा 7000 रुपयांपेक्षा जास्त वाढल्या आहेत."

सोन्या दरांत तेजीचं मुख्य कारण म्हणजे, अमेरिकन डॉलरमधील कमजोरी. या यूएस फेड बँकेने या चक्रात 25 bps ची धीमी दरवाढ किंवा कमाल फक्त एक शेवटची दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. पुढे, सोन्याच्या किमतींत आणखी काही तेजी येण्याची शक्यता आहे. देशांतर्गत, सोन्याचे भाव 58,000-59,000 रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जागतिक आघाडीवर, किमती पूर्वीच्या उच्चांकांना स्पर्श करण्याची आणि 2060-2100/oz च्या श्रेणीत व्यापार करण्याची अपेक्षा आहे."

तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे दर 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  52,507 68,820
पुणे 52,507 68,820
नाशिक  52,507 68,820
नागपूर 52,507 68,820
दिल्ली 52,424 68,750
कोलकाता  52,452 68,770

 तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) 

तुम्ही घरी बसूनही सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

सोनं खरेदी करण्यापूर्वी 'अशी' तपासा सोन्याची शुद्धता (Check Gold Purity) 

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

 महत्त्वाच्या इतर बातम्या : 

BMC Budget 2022-23 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 2 फेब्रुवारीला; मुंबईकरांच्या पदरी यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणत्या गोष्टी पडणार?