Gold Rate Today : जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात कमी अधिक प्रमाणात वाढ किंवा घट होताना दिसते. गेल्या तीन दिवसांपासून आपण पाहतोयत सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ होताना दिसतेय. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार सोन्याचे फ्युचर्स 0.58 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,460 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. तर 1 किलो चांदीचा दर 63,550 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे दर काय आहेत ते पाहा. 

     

सोने-चांदी आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदी 
मुंबई 48,088 63,550
पुणे 47,997 63,430
नाशिक 47,997 63,430
नागपूर 47,997 63,430
दिल्ली 47,914 63,320
कोलकाता 47,933 63,350

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :