Share Market : शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. भारतीय शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 200 अंकानी वधारला होता. तर, निफ्टीत 71 अंकाची तेजी दिसून आली. जागतिक शेअर बाजारात संमिश्र ट्रेंड असल्याचे दिसत आहे. आजही शेअर बाजारात गुंतवणुकदार सावधपणे व्यवहार करण्याची शक्यता आहे. 


प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स जवळपास 200 अंकांनी वधारला होता. सिंगापूर SGX निफ्टी 0.23 टक्क्यांच्या वाढीसह 16,151 अंकांवर व्यवहार करत होता. शेअर बाजार सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी मजबूत झाला. सकाळी 09:20 वाजता, सेन्सेक्स 274.35 अंकानी (0.51 टक्के) वधारून 54,320 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता. NSE निफ्टी देखील 93.25 अंकानी (0.59 टक्के) वधारत 16,215 अंकाच्या आसपास व्यवहार करत होता. प्री-ओपनिंगमध्ये बाजार तेजीत होता. मात्र, त्यात पुन्हा घसरण झाली. 


निफ्टी 50  पैकी 32 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 17 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीत तेजी दिसत आहे. बँक निफ्टी 360 अंकानी वधारला असून 34649 अंकाच्या पातळीवर व्यवहार करत होता. 


मंगळवारी  शेअर बाजार  बंद होताना सेन्सेक्स 236 अंकांनी तर, निफ्टीही 89 अंकानी घसरला होता. सेन्सेक्समध्ये 0.43 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,052 वर बंद झाला. निफ्टीमध्ये 0.55 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,125 वर बंद झाला.  


मंगळवारी 1005 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर 2220 शेअर्समध्ये घसरण झाली. 121 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: