Gold Silver Price Today : रशिया-युक्रेनमधील युद्ध तीन आठवड्यानंतरही सुरुच आहे. या युद्धामुळे जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून अनेक उलाढाली पाहायला मिळत आहेत. सोन्याचे (Gold) दरसुद्धा सतत अस्थिर झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver price) किंचित घसरण झालेली पाहायला मिळतेय. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्या-चांदीचे आजचे ताजे दर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
सोन्या-चांदीचे आजचे ताजे दर :
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,280 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचे आजचे ताजे दर प्रति 10 ग्रॅम 679 रूपये आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 100 रूपयांची घट झाली आहे.
आज 17 मार्च 2022 : जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा दर :
शहर 22 कॅरेट
मुंबई 47,300
पुणे 47,650
नाशिक 47,650
नागपूर 47,380
दिल्ली 51,564
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market : शेअर बाजारात तेजीची धूळवड; सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला
- Income Tax : 136 कोटी लोकसंख्येच्या देशात किती लोक प्राप्तीकर भरतात? सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
- Digital Payment: लवकरच 'टाटा न्यू' डिजिटल पेमेंट अॅप होणार लॉन्च; गुगल पे, पेटीएमला टक्कर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha