Share Market Updates : शेअर बाजारात आज चांगली तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारातील सकारात्मक संकेताचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. भारतीय शेअर बाजाराने आज चांगली उसळण घेतली. सकाळी 10.10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 999 अंकानी वधारला होता. तर निफ्टी 284 अंकांनी वधारला. 


शेअर बाजाराची सुरुवात कशी?


शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 800 अंकांच्या उसळणीसह 57, 620 अंकांवर सुरू झाला. तर, निफ्टीतही तेजी दिसून आली. निफ्टी 17,200 अंकांवर खुला झाला. 


बँक निफ्टीत जोरदार उसळण


बँक निफ्टीत आज जोरदार उसळण दिसून आली. त्याशिवाय बँक निफ्टीमधील सर्व 12 शेअर देखील तेजीत आहेत. बँक निफ्टी जवळपास 700 अंकांनी म्हणजे जवळपास 2 टक्क्यांनी उसळला. बँक निफ्टी चांगली खरेदी दिसून येत आहे. 


कोणत्या सेक्टरमध्ये तेजी?


शेअर बाजारातील सर्व क्षेत्रात तेजी दिसून येत आहे. फायनान्स क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी असून 2 टक्क्यांनी हे क्षेत्र वधारले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, कन्झ्युमर ड्युरेबल्ससह ऑईल आणि गॅस क्षेत्रातील शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. 


प्री-ओपनिंग कशी सुरू झाली?


प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 803.63 अंकांनी म्हणजे 1.41 अंकांनी वधारला. तर, निफ्टी 227 अंकांच्या उसळीनंतर 17202 अंकावर वधारला होता. 


बुधवारीही शेअर बाजारात तेजी


दरम्यान,  बुधवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1,039 अंकांनी तर निफ्टीही 312 अंकानी वधारला होता. सेन्सेक्समध्ये 1.86 टक्क्यांची वाढ होऊन तो 56,816.65 वर पोहोचला आहे. तर, निफ्टीमध्ये 1.87 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,975.30 वर पोहोचला. बुधवारी 2241 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. तर, 1105 शेअर्समध्ये घसरण झाली.  96 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: