एक्स्प्लोर

सोन्याला पुन्हा झळाळी, 3 दिवसात 1400 रुपयांची वाढ, लवकरच देशाच्या राजधानीत होणार नवा विक्रम 

दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत लवकरच सोन्याच्या दराचा नवा विक्रम होऊ शकतो.

Gold Rate : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत लवकरच सोन्याच्या दराचा नवा विक्रम होऊ शकतो. याचे कारण म्हणजे सलग तीन दिवसांत सोन्याच्या दरात 1420 रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी, सलग 6 दिवसात सोन्याच्या दरात 1600 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली होती. 9 दिवसांत सोन्याचे भाव 3,000 रुपयांनी वाढले आहेत. आज सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढला आहे. सध्या सोने 81,600 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.

सलग तिसऱ्या दिवशी सोन्यामध्ये वाढ

देशाची राजधानी दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 700 रुपयांनी झेपावला आणि 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. गुरुवारी सोन्याचा भाव 81,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 81,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 80,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. शुक्रवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी घसरून 93,500 रुपये प्रति किलोवर आला, जो मागील सत्रात 94,000 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

तीन दिवसात किती महाग?

सलग तीन दिवसांत सोन्याच्या दरात 1400 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 220 रुपयांची वाढ झाली. गुरुवारी सोन्याच्या दरात 500 रुपयांची वाढ दिसून आली. शुक्रवारी सोन्याचा भाव 700 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अशा परिस्थितीत सलग तीन दिवस सोन्याचा भाव 1,420 रुपये प्रति दहा ग्रॅमने महागला आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. 

रेकॉर्ड लवकरच तुटण्याची शक्यता 

विशेष म्हणजे दिल्लीतील सोन्याच्या दराचा विक्रम लवकरच तुटण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक बाजारात 99.9 टक्के शुद्धता आणि 99.5 टक्के शुद्धतेचे सोने अनुक्रमे 82,400 रुपये आणि 82,000 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. आता 99 टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून अवघ्या 400 रुपयांनी घसरल्या आहेत. सोमवारीही सोन्याचे भाव असेच सुरू राहिल्यास भाव 82,400 रुपयांच्या पुढे जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत कल असूनही, देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूच्या भावात वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget