Gold Price Hike : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (New Covid variant) संपूर्ण जग धास्तावलं आहे. देशात केंद्र सरकारनं आतापासूनच उपाययोजना सुरु केल्या आहेत. या नव्या व्हेरियंटचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. तसाच काहीसा तो सोन्याच्या किमतींमध्येही झाल्याचं दिसत आहे. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या किमती 219 रुपये प्रति ग्रॅमनं वाढल्या आहेत. त्यानंतर डिसेंबर एक्सपायरी असणारं गोल्ड ₹47,640 प्रति 10 ग्रामवर पोहोचलं. मागील व्यवहार दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात सुमारे 0.50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा दिसतोय परिणाम 


कमोडिटी बाजार तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतींमध्ये झालेली वाढ ही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धास्तीमुळं झालेली आहे. त्यामुळे जागतिक शेअर बाजारातही मोठी विक्री दिसून आली.


शॉर्ट टर्मसाठी गोल्डमध्ये करा खरेदी-विक्री 


जागतिक चलनवाढीमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ होणार असल्याचं बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत पिवळ्या धातूमध्येही मोठी वाढ अपेक्षित आहे. गुंतवणूकदार अल्प कालावधीसाठी सोने खरेदी करू शकतात.


आणखी दर वाढण्याची शक्यता 


कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. मोतीलाल ओसवालमधील कोमोडिटी रिसर्चचे उपाध्यक्ष अमित सजेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किमतींमध्ये आलेल्या तेजीसाठी कोरोनाचा नवा व्हेरियंट जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे.  


सोनं प्रति औंस $1915 वर जाईल


मोतीलाल ओसवालमधील अमित सजेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किमतीला 1760 डॉलर प्रति औंसवर सपोर्ट प्राइज मिळाली आहे. वर्तमानात ही 1780 डॉलर प्रति औंसच्या स्तरावर आहे. सोन्याचा रिस्क रिवॉर्ड रेश्यो जवळपास 1:3 आहे. सध्याच्या पातळीबद्दल बोलणं, खरेदी त्वरित $ 1880 प्रति औंस पातळीवर केली जाऊ शकते. येत्या दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1915 डॉलर प्रति औंसचा स्तर गाठू शकतो.


52,000 हजारांपर्यंत पोहोचणार सोनं 


IIFL सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांच्या मते, गुंतवणूकदार MCX वर 47,500 ते 47,700 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर अल्प मुदतीसाठी सोने खरेदी करू शकतात. यामध्ये टार्गेट प्राइज 48700 रुपयांची ठेवावी लागेल आणि 46900 रुपयांचा स्टॉपलॉस लावावा लागेल. येत्या काही दिवसांत सोनं लवकरच 49700 रुपयांची पातळी गाठेल. त्याच वेळी, पुढील तिमाहीत किंवा आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस, सोन्याची किंमत 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर जाऊ शकते.


(Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :