मुंबई: समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत म्हणजे महात्मा जोतिबा फुले. स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच भारतरत्न द्या, अशी मागणी आतापर्यंत सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. मात्र सरकारं बदलली तरीही ही मागणी आजही कायम आहे. फुले दाम्पत्याने शिक्षणासोबतच सामाजिक क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. महाराष्ट्र सरकारनेही 2016 मध्ये तशी शिफारस केंद्राकडे केली होती.
1954 पासून भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो. चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत 45 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2015 मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर 2019 मध्ये प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिका (मरणोत्तर), नानाजी देशमुख (मरणोत्तर) यांना भारतरत्न पुरस्कार दिला गेला.
सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे. समाजासाठी खूप मोठं काम करणारे हे फुले दाम्पत्य अद्यापही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलेलं नाही.
आत्तापर्यंतच्या भारतरत्नांची यादी :पुरस्कारार्थीचे नाव वर्ष1. चक्रवर्ती राजगोपालाचारी (1878 - 1972) 19542. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1888 - 1975 ) 19543. डॉ. सी.व्ही. रमण (188-1970) 19544. डॉ. भगवान दास (1869 – 1958) 19545. डॉ. एम. विश्वेश्वरैय्या (1861 - 1962 ) 19556. पंडीत जवाहरलाल नेहरु (1889 - 1964 ) 19557. पंडीत गोविंद वल्लभ पंत (1887 - 1961 ) 19578. डॉ. धोंडो केशव कर्वे (1858 - 1962 ) 19589. डॉ. बी. सी. रॉय (1882 - 1962 ) 196110. पुरुषोत्तमदास टंडन (1882 - 1962 ) 196111. डॉ.राजेंद्र प्रसाद (1884 - 1963) 196212. डॉ. झाकीर हुसेन (1897 - 1969 ) 196313. डॉ. पांडुरंग वामन काणे (1880 - 1972 ) 196314. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (1904 - 1966 ) 196615. इंदिरा गांधी (1817 - 1984 ) 197116. व्ही. व्ही. गिरी (1894 - 1980 ) 197517. के. कामराज (मरणोत्तर) (1903 - 1975 ) 197618. मदर टेरेसा (1910 - 1997 ) 198019. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (1895 - 1982 ) 198320. खान अब्दुल गफ्फार खान (1890 - 1988 ) 198721. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (1917 - 1987 ) 198822. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) (1891 - 1956 ) 199023. डॉ. नेल्सन मंडेला (1918 - 2013 ) 199024. राजीव गांधी (मरणोत्तर) (1944 - 1991 ) 199125. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1875 - 1950 ) 199126. मोरारजी देसाई (1896 - 1995 ) 199127. मौलाना अबुल कलाम आझाद(मरणोत्तर) (1888- 1958) 199228. जे. आर. डी. टाटा (1904 - 1993 ) 199229. सत्यजीत रे (1922 - 1992 ) 199230. गुलझारीलाल नंदा (1898 - 1998 ) 199731. श्रीमती अरुणा असफ अली (मरणोत्तर) (1909 - 1996 ) 199732. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म 1931) 199733. श्रीमती एम. एस. सुब्बुलक्ष्मी (1916 - 2005 ) 199834. सी. सब्रमण्यम (1910 - 2000 ) 199835. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1902 - 1979 ) 199936. प्रा. अमर्त्य सेन (जन्म 1933 ) 199937. लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलाई (मरणोत्तर) (1890 - 1950 ) 199938. पंडीत रवी शंकर (1920 - 2012 ) 199939. लता मंगेशकर (जन्म 1929 ) 200140. उस्ताद बिस्मिल्लाह खान (1916 - 2006 ) 200141. पं. भीमसेन जोशी (1922 - 2011 ) 200942. प्रा. सी. एन. आर. राव ( जन्म 1934 ) 201443. सचिन तेंडुलकर ( जन्म 1973 ) 201444. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) (1861 - 1946) 201545. अटलबिहारी वाजपेयी ( जन्म 25 डिसेंबर 1924 ) 201546. प्रणब मुखर्जी (2019)47. भूपेन हजारिका (मरणोत्तर) (2019)48. नानाजी देशमुख (मरणोत्तर) (2019)