मुंबई : केंद्र सरकारने नुकतेच पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हफ्ता वर्ग केला आहे. यो योजनेअंतर्गत साधारण 9.6 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. असे असतानाच आता खरीप हंगामातील एकूण 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. या निर्णयामुळे या वर्षी शेतकऱ्यांना पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ
केंद्र सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. बुधवारी (19 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हमीभाव वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर याच बैठकीत हमीभावासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहिती दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय
अश्विनी वैष्णव म्हणाले की, पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2018 साली घेतला होता. हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमीभाव ठरवले आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण 14 महत्त्वाच्या पिकांचा हमीभाव वाढवला आहे. धान या पीकाचे हमीभाव 2300 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. हा भाव गेल्या वर्षांच्या तुलनेत 117 रुपयांनी जास्त आहे. 2013-14 मध्ये धान या पिकाचा हमीभाव 1310 रुपये प्रति क्विंटल होता.
खालील पिकांचा हमीभाव वाढवा, नवा दर काय?
ज्वारी- 3,371 रुपये प्रति क्विंटल
नाचणी- 2,490 रुपये प्रति क्विंटल
बाजरी- 2,625 रुपये प्रति क्विंटल
मक्का- 2,225 रुपये प्रति क्विंटल
मूग- 8,682 रुपये प्रति क्विंटल
तूर- 7,550 रुपये प्रति क्विंटल
उडीद- 7,400 रुपये प्रति क्विंटल
तीळ- 9,267 रुपये प्रति क्विंटल
भुईमूग- 6,783 रुपये प्रति क्विंटल
रेपीसीड- 8,717 रुपये प्रति क्विंटल
सूर्यफूल- 7,280 रुपये प्रति क्विंटल
सोयाबीन- 4,892 रुपये प्रति क्विंटल
दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
आयटीआर नेमका कोणी भरला पाहिजे? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर..
प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!
आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?