मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Gold And Silver Rate Today) चढऊतार पाहाला मिळतोय. काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर थेट 75 हजारांच्या घरात पोहोचला होता. भविष्यात हा दर एका लाखापर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र गेल्या आठवड्यापासून सोन्याचा दर (Gold Rate) कमी झाला. मात्र आज (2 मे) पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढलेला पाहायला मिळाला. आज वायदा बाजारात म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा दर साधारण 400 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढल्याचे पाहायला मिळाले. सध्या सोने प्रति 10 ग्रॅम 71,000 हजार रुपयांच्या वर पोहोचले आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही (Silver Rate Today) वाढ झाली आहे. ही वाढ 50 रुपये प्रतिकिलो आहे. सध्या चांदीचा भाव 80,000 रुपये प्रतिकिलो झाला आहे. 


MCX वर सोन्याचा दर काय?


गुरुवारी वायदा बाजारात सोन्याचा दर वाढलेला पाहायला मिळाला. एमसीएक्सवर बाजाराच्या सुरुवातीला सोन्याचा दर 71,120  रुपयांवर पोहोचला. सकाळी 10:20 वाजता यात साधारण 400 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. याआधी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा दर 70,725 रुपये होता. आज एमसीएक्सवर चांदीच्या दरातही 175 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 80,045 रुपये झाला आहे. मंगळवारी चांदीचा दर 79,870 रुपये होता.


सोन्याचा भाव का वाढला? (Why Gold Rate Increased)


अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँने आपल्या पतधोरणात कोणताही बदल केलेला नाही. या बँकेने सलग सातव्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत. मात्र या वर्षाच्या शेवटी व्याजदरात बदल होण्याची शक्यता या बँकेने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी ही तेजी अशीच वाढत जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


देशातील प्रमुख शहरांत सोन्याचा दर काय? 


दिल्ली- 24 कॅरेट सोने- 73,250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी- 83,500 रुपये प्रति किलो 
मुंबई- 24 कॅरेट सोने- 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी- 83,500 रुपये प्रति किलो
कोलकाता- 24 कॅरेट सोने 72,420 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी- 83,500 रुपये प्रति किलो 
पुणे- 24 कॅरेट सोने- 72,270 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी- 83,500 रुपये प्रति किलो


हेही वाचा :


'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!


म्हातारपणी पेन्शन देणारी 'एनपीएस' योजना काय आहे? मध्येच गुंतवणूक थांबवल्यास काय होणार? जाणून घ्या सविस्तर!


'हे' पाच मिडकॅप फंड, ज्यांनी अनेकांना केलं लखपती, तीन वर्षांपूर्वी SIP करणारे आज मालामाल!