'या' तीन बँकांचा विषय खोल! एका वर्षाच्या एफडीवर देतात तगडं व्याज!
आजही मुदत ठेव म्हणजेच एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मनला जातो. कोणताही धोका न पत्करता एका निश्चित काळानंतर चांगला परतावा मिळावा म्हणून लोक वेगवेगळ्या बँकांत एफडीच्या रुपात गुंतवणूक करतात. दरम्यान, आपल्या देशात वेगवेगळ्या बँका एफडीवर वेगवेगळं व्याज देतात. याच पार्श्वभूमीवर एफडीवर चांगले व्याज देणाऱ्या तीन बँकांबद्दल जाणून घेऊ या...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडीसीबी बँक लोकांना एफडीच्या रुपात गुंतवणुकीचा पर्याय देते. तुम्ही एका वर्षासाठी एफडीच्या रुपात पैसे गुंतवण्याचा विचार करत अशाल तर तुमच्यासाठी डीसीबी बँक चांगला पर्याय ठरू शकतो. कारण ही बँक एका वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देते. हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आहे.
तमिळानाड मर्कंटाईल बँक हादेखील एफडीसाठी चांगला पर्याय आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना एका वर्षाच्या एफडीला 7.25 टक्क्याने व्याज देते. हाच व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 टक्के आहे.
कॅनरा बँक हादेखील एफडीसाठी चांगला पर्याय आहे. ही बँक एफडीवर ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. तुम्ही एका वर्षासाठी एफडीचा विचार करत असाल तर तुम्हाला ही बँक सात टक्के व्याज देईल. ही बँक ज्येष्ठ नागरिकांनादेखील 7.70 टक्के व्याज देते.
(टीप- फक्त माहिती देणे हा या लेखाचा उद्देश आहे. आम्ही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. गुंतवणुकीसाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)