Varuthini Ekadashi 2024 : हिंदू धर्मात एकादशीचं खास महत्त्व आहे. या दिवशी श्री हरीसह देवी लक्ष्मीची (Lord Laxmi) देखील पूजा केली जाते. वैशाख महिन्यातील येणाऱ्या एकादशी (Ekadashi) तिथीला वरूथिनी एकादशी (Varuthini Ekadashi) म्हणतात. असं म्हणतात की जे भाविक या व्रताची भक्तिभावाने पूजा करतात, पालन करतात त्यांना धनप्राप्ती होते. तसेच, घरात सुख-समृद्धी नांदते. 


यावर्षी वरुथिनी एकादशीचं व्रत 4 मे रोजी शनिवारी ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शुभ दिनी अनेक शुभ योगांची देखील निर्मिती होणार आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. 


या शुभ योगांत करा भगवान विष्णूची पूजा 


वैदिक पंचागानुसार, वरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, इंद्र योग आणि वैधृति योगाची निर्मिती झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हे सर्व योग शुभ मानले जातात. असं म्हणतात की, या दरम्यान भगवान विष्णूची पूजा केल्याने आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळते. त्याचबरोबर चांगलं पुण्यही मिळतं. वरुथिनी एकादशीच्या दिवशी भिपुष्कर योग पहाटे 4 वाजून 3 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी हे व्रत समाप्त होणार आहे. याचबरोबर इंद्र योग संपूर्ण दिवसभर असणार आहे. या व्यतिरिक्त वैधृति योग सकाळी 8 वाजून 24 मिनिटांनी सुरु होऊन तो एकादशी तिथीच्या दिवशी समाप्त होईल. 


'या' दिवशी करा वरुथिनी एकादशीचं व्रत


यावर्षी वरुथिनी एकादशीचा उपवास 4 मे 2024 रोजी ठेवण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी शुक्रवार, 03 मे 2024 रोजी रात्री 11:24 वाजता सुरू होईल. त्याच वेळी, ते दुसऱ्या दिवशी शुक्रवार, 4 मे 2024 रोजी रात्री 08:38 वाजता संपेल. उदयतिथी लक्षात घेऊन ४ मे रोजी वरुथिनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Guru Shukra Yuti 2024 : गुरु-शुक्राच्या युतीमुळे 'या' राशींचं भाग्य उजळणार; मेहनतीला मिळेल यश, मनातील इच्छाही होतील पूर्ण