Foxconn Investment : एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात गेल्याने रोजगाराच्या संधी हिरावल्या जात असल्याचे आरोप होत आहेत. तर, दुसरीकडे , शेजारील राज्यांत चांदी होत असून अ‌ॅपलचा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. विशेष म्हणजे ही गुंतवणूक नुकतेच महाराष्ट्रात राजकीय पाय रोवणाऱ्या केसीआर यांना तेलंगणात खेचून आणण्यात यश आले आहे. याबाबत त्यांनी एक ट्विटही केले आहे.


फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गुरुवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या बैठकीनंतर या प्लांटबाबतची घोषणा करण्यात आली. फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारने मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या प्रगती भवन येथे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 


या कराराद्वारे 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील 1 लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. ही तैवानची कंपनी राज्यात किती गुंतवणूक करणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. 


फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंग युनिटमुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे तेलंगणा सरकारने म्हटले. राज्यात यापुढेही अनेक उद्योगधंदे येतील असा विश्वासही सरकारने व्यक्त केला. 






फॉक्सकॉनचा भारताकडे कल


चीनसोबत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनकडून चीनमधील प्लांट आता भारतात हलवण्यात येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. फॉक्सकॉनकडून भारतातील प्लांटसाठी 700 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. 


फॉक्सकॉन ही मूळची तैवान येथील कंपनी आहे. फॉक्सकॉन कंपनीकडून आयफोनचे भाग तयार करण्यात येतात. आता,  फॉक्सकॉनकडून चीनमधील आयफोन प्लांट उभारण्यात येणार आहे.  


फॉक्सकॉनकडून होणारी ही  भारतातील गुंतवणूक मोठी गुंतवणूक असल्याचे म्हटले. इलेक्ट्ऱॉनिक्स वस्तू, स्मार्टफोन निर्मितीसाठी जगभरातील कंपन्यांकडून चीनला मोठी पसंती असते. मात्र, कोरोना काळानंतर अनेक कंपन्यांनी चीनला पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. चीनमधील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या कारखान्यासाठी भारत, व्हिएतनाम सारख्या देशांचा पर्याय समोर आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


फेब्रुवारीत सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्रातून जमा; दुसऱ्या स्थानावरील राज्यापेक्षा दुप्पट कर संकलन