GST Collection From Maharashtra :  अर्थ मंत्रालयाने आज  फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी कर संकलनाची (GST Collection) आकडेवारी जाहीर केली आहे. फेब्रुवारी महिन्यात जीएसटी कर संकलन (GST) 1,49,577 कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 12 टक्क्यांची तेजी दिसून आली. फेब्रुवारी महिन्यातही महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी (GST From Maharashtra) वसूल करण्यात आला. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक (Karnataka) राज्य आहे. मात्र, कर्नाटकच्या तुलनेत महाराष्ट्राचे उत्पन्न जवळपास दुप्पट आहे. 

महाराष्ट्रातून  फेब्रुवारी 2023 मध्ये 22 हजार 349 कोटींचा जीएसटी जमा करण्यात आला. तर, कर्नाटक राज्यातून 10 हजार 809 कोटी रुपयांचा जीएसटी कर जमा करण्यात आला. तिसऱ्या स्थानावर गुजरात राज्य आहे. गुजरातने मागील महिन्यात 9 हजार 574 कोटींचा कर जमा केला. 

 

राज्य

फेब्रुवारी-22

रक्कम कोटींमध्ये

फेब्रुवारी-23

रक्कम कोटींमध्ये

वाढ

जम्मू आणि काश्मीर 

326

434

33%

हिमाचल प्रदेश

657

691

5%

पंजाब

1,480

1,651

12%

चंदिगड

178

188

5%

उत्तराखंड

1,176

1,405

20%

हरयाणा

5,928

7,310

23%

दिल्ली

3,922

4,769

22%

राजस्थान

3,469

3,941

14%

उत्तर प्रदेश

6,519

7,431

14%

बिहार 

1,206

1,499

24%

सिक्कीम

222

265

19%

अरुणाचल प्रदेश

56

78

39%

नागालँड

33

54

64%

मणिपूर

39

64

64%

मिझोरम

24

58

138%

त्रिपुरा

66

79

20%

मेघालय

201

189

-6%

आसाम

1,008

1,111

10%

पश्चिम बंगाल

4,414

4,955

12%

झारखंड

2,536

2,962

17%

ओदिशा

4,101

4,519

10%

छत्तीसगड

2,783

3,009

8%

मध्य प्रदेश

2,853

3,235

13%

गुजरात

8,873

9,574

8%

दादरा आणि नगर हवेली

260

283

9%

महाराष्ट्र

19,423

22,349

15%

कर्नाटक

9,176

10,809

18%

गोवा

364

493

35%

लक्षद्वीप

1

3

274%

केरळ

2,074

2,326

12%

तामिळनाडू

7,393

8,774

19%

पाँडिचेरी

178

188

5%

अंदमान आणि निकोबार बेटं

22

31

40%

तेलंगणा

4,113

4,424

8%

आंध्र प्रदेश

3,157

3,557

13%

लडाख

16

24

56%

इतर प्रदेश

136

211

55%

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले विभाग

167

154

-8%

एकूण

98,550

1,13,096

15%

 

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी  ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि  ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर  केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या  महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची  AG प्रमाणित आकडेवारी  पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटीमध्ये घट

जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये जीएसटी महसुलात घट झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये 1.57 लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. आतापर्यंतचा हा दुसरा क्रमांकाचा सर्वाधिक आकडा आहे. एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटी रुपयांचा महसूल जीएसटीद्वारे मिळाला होता. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये एकूण GST संकलन 1,49,577 कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय GST (CGST) 27,662 कोटी रुपये आहे. तर राज्य GST (SGST) कर संकलन 34,915 कोटी रुपये आहे. तर IGST 75,069 कोटी रुपये जमा झाले आहेत. याशिवाय 11,931 कोटी रुपयांच्या उपकराचाही समावेश आहे.

जीएसटी संकलन दरवर्षी 12 टक्क्यांनी वाढले

वर्षभरापूर्वी याच महिन्यात जीएसटी संकलन 1.33 लाख कोटी रुपये होते. फेब्रुवारी 2023 शी तुलना करता जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ 28 दिवस असल्याने जीएसटी संकलन इतर महिन्यांच्या तुलनेत कमी असल्याकडे ही अर्थ मंत्रालयाने लक्ष वेधले आहे.