World Cup Economy: भारतात सध्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चा (World Cup 2023) उत्साह पाहायला मिळत आहे. या विश्वचषकात आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. यावेळी भारत क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवत असून विश्वचषकाचा प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. अशा स्थितीत प्रेक्षकांचा तसेच बाजारपेठेतही उत्साह शिगेला पोहोचला आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनामुळं देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशातच आता माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेनेही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.


या उद्योगांना थेट लाभ मिळणार 


माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेने विश्वचषकाबाबत बोलताना म्हटले आहे की, हा मेगा इव्हेंट केवळ क्रिकेटचा नाही. याचा पर्यटन, आदरातिथ्य, जाहिरात आणि व्यापार यांसारख्या अनेक उद्योगांना चांगला फयदा होणार आहे. विश्वचषकामुळं एकूण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. माजी क्रिकेटपटूने विशेषतः तीन उद्योगांचा उल्लेख केला आणि सांगितले की विश्वचषक अर्थव्यवस्थेसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे.


जाहिरात क्षेत्र (Advertising)


अनिल कुंबळे यांनी क्रिकेट विश्वचषकाचे वर्णन जाहिरातदारांसाठी सोन्याची खाण असे केले आहे. या कार्यक्रमामुळं ब्रँड्सना एकाच वेळी करोडो लोकांच्या नजरेत येण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. वैविध्यपूर्ण असेलेले प्रेक्षकांना कोणताही ब्रँड आवडू  शकतो. या वर्षी, टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरातींमधून 2000 ते 2200 कोटी रुपयांची कमाई अपेक्षित आहे. जी गेल्या विश्वचषकापेक्षा 40 टक्के अधिक आहे.


आदरातिथ्य क्षेत्र


माजी क्रिकेटर अनिल कुंबळेंनी सांगितले की, विश्वचषक आयोजित केल्यानं भारत देश विविध उपक्रमांचे केंद्र बनला आहे. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट आणि पर्यटन स्थळांमध्ये लोकांची वर्दळ वाढत आहे. 2015 विश्वचषकादरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील हॉटेल्समध्ये दोन दशलक्ष बेड नाईटची नोंद झाली. प्रत्येकी 5 लोक 2 लोकांच्या रुम शेअर करत होते. 2019 विश्वचषकादरम्यान, इंग्लंड आणि वेल्समधील आदरातिथ्य उद्योगात 40 टक्के वाढ नोंदवली गेली.


पर्यटन


विश्वचषकादरम्यान, भारताला जगभरातील प्रेक्षकांसमोर आपली आकर्षक पर्यटन स्थळे सादर करण्याची संधी मिळते. 2015 मध्ये, 1.45 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट दिली. 2015 विश्वचषक फायनलचे आयोजन करणाऱ्या मेलबर्नसारख्या शहरांमध्ये पर्यटनात लक्षणीय वाढ झाली. या माध्यमातून देशाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. परिणामी अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा होणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


India Economy: HDFC च्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, 2050 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था एवढ्या पटीनं वाढणार