India Economy: HDFC बँकेचे अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठं विधान केलं आहे. 2050 पर्यंत भारताचा GDP सुमारे 900 टक्क्यांनी म्हणजेच 10 पटीनं वाढणार आहे. 2050 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ही 30000 अब्ज अमेरिकन डॉलर्सची बनेल, असे चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. यासोबतच त्यांनी भारताच्या दरडोई उत्पन्नातही प्रचंड वाढ होण्याची आशा व्यक्त केली आहे.


2050 पर्यंत दरडोई उत्पन्न इतके असेल


अतनु चक्रवर्ती यांच्या मते, भारताचे दरडोई उत्पन्न 2050 पर्यंत 21,000 डॉलरपर्यंत वाढेल. सध्या ते सुमारे 1,183 डॉलर आहे. पीटीआयच्या बातमीनुसार, ते म्हणाले की, सध्या, बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, भारताचा जीडीपी सुमारे 6.3 टक्के असेल. त्याचवेळी देशातील महागाई दर सहा टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सध्याच्या किमतींनुसार जीडीपी सुमारे 10 ते 12 टक्के अपेक्षित आहे. भारताचा विकास दर असाच सुरू राहिल्यास 2050 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 30,000 अब्ज डॉलर्सची होण्याची अपेक्षा आहे.


भारतीय अर्थव्यवस्था 900 टक्क्यांनी वाढेल


भारत सध्या 3.75 ट्रिलियन डॉलरसह जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल डी पात्रा यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात सांगितले होते की, भारत 2027 पर्यंत 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल. तर पुढील 27 वर्षांत भारताचा जीडीपी 900 टक्क्यांनी वाढेल आणि 30 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा पार करेल असे मत एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच 2023-24 या आर्थिक वर्षात भारताच्या जीडीपीच्या वाढीचा अंदाज जाहीर केला आहे. IMF च्या मते, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.3 टक्के दराने वाढेल. यापूर्वी IMF ने चालू आर्थिक वर्षात GDP 6.1 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता.


पुढील आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 6 ते 6.8 टक्के दराने वाढेल अशी अपेक्षा आर्थिक सर्वेक्षणात (Economic Survey)  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी व्यक्त केली होती. जागतिक मंदीमुळे भारतातून होणाऱ्या निर्यातीचा वेग मंदावण्याची भीती आहे. त्यामुळेच गेल्यावर्षी 7 टक्क्यांच्या वाढीने वाढण्याची अपेक्षा करण्यात आली असताना आता त्यात एक टक्क्याची घट अपेक्षित आहे. 2022-23 या वर्षात सेवा क्षेत्राची वाढ खूप चांगली झाली आहे. सेवा क्षेत्राने 8.4 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये सेवा क्षेत्रात 9.1 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Morgan Stanley Report: मागील 10 वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात मोदी सरकारचे कौतुक