मुंबई : नोकरीवर असताना कर्मचारी वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्टी (लिव्ह) घेतात. कौटुंबिक तसेच इतर अडचणी समोर आल्यावर रितसर अर्ज करून या सुट्ट्या मिळवता येतात. याध्ये पगारी सुट्टी (अर्न लिव्ह), क्याज्युअल लिव्ह, ट्रॅव्हल लिव्ह, मॅटर्निटी लिव्ह, पॅटर्निटी लिव्ह असे सुट्ट्यांचे वेगवेगळे पर्याय कर्मचाऱ्याकडे उपलब्ध असतात. आपल्या गरजेनुसार कर्मचारी या सुट्ट्या घेत असतो. मात्र कधीकधी अशा गोष्टी घडतात ज्या कंपनीच्या व्यवस्थापनाला सांगता येत नाहीत, पण त्या परिस्थितीत सुट्टी हवी असते. कर्मचाऱ्यांच्या याच अडचणीवर एका फिनटेक कंपनीने जबरदस्त तोडगा काढला आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना थेट ब्रेकअप लिव्ह (Break Up Leave) देत आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची लिव्ह घेतल्यानंतर पूर्ण पगार मिळणार आहे. 


ब्रेकअप झाल्यावर थेट सुट्टी मिळणार


फायनॅन्शीयल टेक्नॉलॉजीत काम करणाऱ्या 'स्टॉक ग्रो' नावाच्या कंपनीनने (Stock Grow) आपल्या कर्मचाऱ्यासाठी हे धोरण लागू केले आहे. कर्मचारी कठीण काळातून जात असताना त्यांना आधार देण्यासाठी या कंपनीने ही लिव्ह लागू केली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याचं नातं तुटल्यानंतर तो तणावात, दु:खात असेल तर या लिव्हमुळे त्याला फायदा होईल. ब्रेकअप लिव्ह घेतल्यानंतर (Stock Grow Break Up Leave) त्याला या धक्क्यातून बाहेर येण्यास मदत होईल, असं या कंपनीचं मत आहे. आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी आहे. आम्हाला त्यांचे दु:ख समजते. या धोरणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कठीण काळात आम्हाला त्यांच्यासोबत राहायचे आहे, असेही या कंपनीने म्हटले आहे. 


ना प्रश्न विचारणार, ना पुरावा मागणार 


स्टॉक ग्रो या कंपनीने ब्रेकअप लिव्हसाठी खास धोरण आखले आहे. एखादा कर्मचारी ब्रेकअप लिव्ह घेत असेल तर त्याला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, तसेच त्याच्याकडे ब्रेकअपसाठीचा कोणताही पुरावा मागितला जाणार नाही. कर्मचाऱ्याला सात दिवसांपर्यंत ब्रकेअप लिव्ह घेता येणार आहे. आपल्या बॉसशी बोलून ही लिव्ह वाढवूनही घेता येऊ शकते. अशा प्रकारच्या सुट्ट्यांमुळे कर्मचाऱ्याला त्याच्या कठीण काळात शांती मिळेल आणि कामावर रुजू झाल्यावर ते चांगल्या प्रकारे काम करायला लागेल, असा विचार कंपनीने केला आहे.


कंपनीचं नेमकं म्हणणं काय?


या धोरणाबाबत स्टॉक ग्रो कंपनीचे संस्थापक अजय लखोटिया यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण आपले विचार बदलायला हवेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडे एका कुटंबाप्रमाणे बघतो. आम्हाला कर्मचाऱ्यांच्या कठीण काळात आम्हाला त्यांची साथ द्यायची आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही ब्रेकअफ लिव्ह धोरण लागू केले आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा देतो. ब्रेकअप झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी पूर्ण वेळ मिळावा, असे आम्हाला वाटते, अशी प्रतिक्रिया लखोटिया यांनी दिलीय. 


दरम्यान, स्टॉक ग्रो ही एक फिनटेक कंपनी आहे. ही कंपनी तिच्या ग्राहकांना ट्रेडिंग, गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करते. आमच्याकडे ३ कोटी युजर्स आहेत, असं ही कंपनी सांगते.


हेही वाचा :


'या' पाच बँका देतात FD वर भरघोस व्याज, एका वर्षासाठी पैसे गुंतवल्यास होणार मोठा फायदा!


आता टेन्शन नाय घ्यायचं! 'या' पाच मार्गांनी तुमच्या कर्जाचा हफ्ता होईल कमी; वाचा A टू Z माहिती


 RBI ची देशातील 'या' बँकेवर मोठी कारवाई, सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या...