मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग सातव्यांदा रेपो दर स्थिर ठेवले आहेत. साधारण वर्षभरापासून हा रेपो दर 6.5 टक्के आहे. यावेळीतरी रेपो दर (Repo Rate) कमी करून कर्जधारकांना दिलासा दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसे झाले नाही. विशेषत: गृहकर्जधारकांना त्यांचे इएमआय (Loan EMI) कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांची निराशाच झाली. दरम्यान, आरबीआयने दिलासा दिलेला नसला तरी कर्जाचा, विशेषत: गृहकर्जाचा हफ्ता (ईएमआय) कमी करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. तुम्ही या पर्यायांची मदत घेऊन तुमचे ईएमाय कमी करू शकता. 


ईएमआय कमी कसा करता येतो?


कर्जाचे ईएमआय भरून अनेकजण कंटाळून जातात. आर्थिक ओढातान होत असल्यामुळे गृहकर्ज तसेच इतर कर्जाचे इएमआय डोईजड होऊन बसतात. मात्र कर्जाचे हफ्ते फेडताना अडचणी येत असतील तर वेगवेगळ्या मार्गाने सध्या चालू असलेले इएमआय कमी करू घेता येतात. यातला सर्वांत पहिला मार्ग म्हणजे बँकेकडे कर्जावरील व्याज कमी करा, अशी विनंती करणे. तुमचा सीबील स्कोअर चांगला असेल तर तुम्ही अशा प्रकारची विनंती बँक प्रशासनाला करू शकता. विशेष म्हणजे तुमच्या चांगल्या सीबील स्कोअरमुळे बँकेचा मॅनेजर तुमच्या कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. तेवढे अधिकार बँक मॅनेजरकडे असतात. 


आणखी चार पर्याय कोणते? 


 1) कर्जाचा इएमाय कमी करण्याचा दुसरा एक पर्याय आहे. तुम्ही जर फिक्स इंटरेस्ट धोरणानुसार कर्ज घेतले असेल तर हे कर्ज फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर बदलता येऊ शकते. आरबीआय भविष्यात रेपो रेट कमी कमी करू शकते. अशावेळी फ्लोटिंग इंटरेस्ट रेटनुसार तुमचे इएमाय कमी होऊ शकतात. 


2) कर्ज फेडण्याचा कालावधी वाढवून घेऊन तुम्हाला इएमआय कमी करून घेता येऊ शकतो. यामुळे तुमचे आर्थिक गणित बिघडणार नाही. 


3) ईएमआय आणि व्याजदर कमी करायचा असेल तर तुमचे सध्या चालू असलेले कर्ज पोर्ट करता येऊ शकते. म्हणजेच तुमचे कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करता येऊ शकते. असे केल्यास तुमची नवी बँक व्याजदर कमी करू शकते. यामुळे तुमचा ईएमआय कमी होऊ शकतो.  


4) ईएमआय कमी करायचे असतील तर दरवर्षी तुम्ही एक किंवा दोन किंवा त्यापेक्षा अधिक ईएमआय भरू शकता. यामुळे तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होईल. सोबतच तुमचे ईएमायदेखील कमी होण्यास मदत होईल. 


( टीप- कोणताही आर्थिक निर्णय घेताना या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) 


हेही वाचा :


 RBI ची देशातील 'या' बँकेवर मोठी कारवाई, सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या...


आता बँकेत जाण्याची कटकट मिटणार! UPI च्या मदतीने पैसे खात्यात जमा करता येणार; जाणून घ्या संपूर्ण माहिती


 RBI ची देशातील 'या' बँकेवर मोठी कारवाई, सामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या...