मुंबई : आपण गुंतवलेला पैसा हा सुरक्षित असावा तसेच त्यातून चांगला परतावा मिळावा अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परतावा मिळण्याची हमी लक्षात घेऊनच लोक वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक करतात. यामध्ये शेअर बाजार (Share Market), म्युच्युअल फंड (Mutual Fund), सोव्हरिएन बॉण्ड यांचा समावेश आहे. मात्र एफडीच्या (FD) माध्यमातूनही चांगला नफा मिळवता येतो. विशेष म्हणजे एफडीच्या माध्यमातून गुंतवलेले पैसे हे बुडण्याचाही धोका नसतो. याच कारणामुळे सध्या एफडीवर आकर्षक व्याज देणाऱ्या सर्वोत्कृष्ट पाच बँकांबद्दल जाऊ घेऊ या..


एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास एका विशिष्ट कालावधीनंतर ग्राहकांना निश्चित व्यजदारानुसार परतावा मिळतो. यामध्ये पैसे बुडण्याचा धोका नसतो. सध्या अशा काही बँका आहेत, ज्या एका वर्षाच्या एफडीमध्ये ग्राहकांना आकर्षक व्याजासह परतावा देतात. यामध्ये सर्वांत पहिल्यांदा नाव येते ते डीसीबी बँकेचे. ही बँक एका वर्षाच्या एफडीवर साधआरण 7.25 टक्के व्याज देते. एखादा ज्येष्ठ नागरिक याच कालावधीसाठी एफडी करत असेल तर ही बँक अशा ग्राहकांना 7.75 टक्के व्याज देते. 


Tamilnad Mercantile Bank


तमिलनाड मर्केंटाईल बँकदेखील आपल्या ग्राहकांना एका वर्षांच्या एफडीवर साधारण 7.25 टक्के व्याज देत आहे. डीसीबी बँकेप्रमाणेच ही बँकदेखील ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.75 टक्के व्याज देत आहे.


कर्नाटक बँक 


कर्नाटक बँकेत तुम्ही एफडी करत असाल तर ही बँक तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर सात टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना ते 7.40 टक्के व्याजदराने परतावा देत आहेत.


डॉइश बँक 


डॉइश बँकदेखील आपल्या ग्राहकांना एफडीवर आकर्षक व्याज देत आहे. तुम्ही या बँकेत एका वर्षासाठी एफडी करत असाल तर तुम्हाला ही बँख सात टक्के दराने तुमची रक्कम परत करेल. ज्येष्ठ नागरिकांनाही ही बँक सात टक्के दरानेच परतावा देत आहे. 


दरम्यान, शेअर बाजाराच्या माध्यमातून गेलेल्या गुंतवणुकीत फायदा होणार की तोटा हे बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असते. बाजार कोडलमडला तर आपण गुंतवलेले पैसेदेखील जातात. बाजारात तेजी असल्यास आपण गुंतवलेल्या पैशांचे मूल्यही वाढते. मात्र एफडीमध्ये अशा प्रकारची जोखीम नसते. कोणताही धोका न पत्करता गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला नफा हवा असेल तर एफडी हा सर्वोत्तम पर्याय आहे. 


(टीप- आम्ही या लेखाच्या माध्यमातून आम्ही कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. कोठेही गुंतवतणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)