Forbes Billionaire List : जगातील श्रीमंत आणि गरिब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. गरिब अधिकच गरिब होत आहे, तर श्रीमंत अधिकच श्रीमंत होत आहे. दरम्यान, तुम्हाला जगातील श्रीमंत व्यक्ती कोण किंवा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? याबद्दल माहिती असेल. पण तुम्हाला जगातील सर्वात तरुण अब्जाधिश (World Young Billionaire)  कोण आहे? याबाबतची माहिती आहे का? तर ब्राझीलची 19 वर्षाची तरुणी जगातील सर्वात तरुण अब्जाधिश आहे. 


लिव्हिया वोग्ट या तरुणीकडे किती संपत्ती? 


ब्राझीलची 19 वर्ष वय असलेली विद्यार्थिनी लिव्हिया वोग्ट ही सर्वात तरुण अब्जाधीश ( Livia Voigt become World Young Billionaire) बनली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत याबाबतची माहिती देण्यात आलीय. लिव्हिया वोग्ट या तरुणीकडे सध्या एकूण संपत्ती ही 1.1 अब्ज डॉलर्स आहे. दरम्यान, भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर झिरोधाचे संस्थापक नितीन आणि निखिल कामथ हे भारतातील सर्वात तरुण अब्जाधिश आहेत. यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिन्नी बन्सल यांचा नंबर लागतो. 


जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण?


फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंकोइस बेटनकोर्ट मेयर्स (Françoise Bettencourt Meyers) या जगातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये त्यांचा 15 वा क्रमांक लागतो. मेयर्स यांच्याकडं 99.5 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तर ॲलिस वॉल्टन या जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्ती आहेत. ॲलिस यांची एकूण संपत्ती ही 72.3 अब्ज डॉलर आहे. कोच इंडस्ट्रीजच्या ज्युलिया कोच यांचा जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला म्हणून नंबर लागतो. त्यांची एकूण संपत्ती ही 64.3 अब्ज डॉलर आहे. जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. त्यांच्याकडे एकूण संपत्ती ही 33.5 अब्ज डॉलर्स आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Who is Renuka Jagtiani : कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?