Horoscope Today 7 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....
तूळ (Libra Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्ही आपल्या कामाशी काम ठेवा. इतरांच्या वादात उगाच पडू नका. नंतर त्यात तुम्हीच फसाल आणि अडचणीत याल.
व्यवसाय (Business) - ग्रहांच्या स्थितीनुसार, आज तुम्ही अनावश्यक खर्च टाळावा. कारण हेच पैसे तुम्हाला भविष्यात उपयोगी येऊ शकतात. आर्थिक तंगी भविष्यात येण्याची शक्यता आहे.
तरुण (Youth) - आज तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या विचारात अस्वस्थ वाटेल. पण जसजसा दिवस जाईल तसंतसं तुमचं दुख आणि विचार दोन्ही कमी होतील. फक्त भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका.
आरोग्य (Health) - आज महिलांनी स्वयंपाकघरातील काम करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला ईजा होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक रास ( Scorpio Today Horoscope)
नोकरी (Job) - आज कामामध्ये अनपेक्षितपणे तुमच्या सहकार्यांचं सहकार्य तुम्हाला लाभेल. याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. यासाठी सर्वांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील.
व्यवसाय (Business) - व्यापारी वर्गाने व्यवसायात मोठ्या लाभाची अपेक्षा न ठेवता छोट्या नफ्यातही आनंद मानावा. अन्यथा नंतर पश्चातापाची वेळ येईल. ज्या महिला लघुउद्योग करतायत त्यांना कामाच्या ऑर्डर्स मिळतील.
कुटुंब (Family) - कुटुंबात कोणत्याही छोट्या कारणावरून वरिष्ठांशी वाद घालू नका. अन्यथा गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. नातेसंबंधात कटुता येऊ शकते.
आरोग्य (Health) - जे बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
धनु (Sagittarius Today Horoscope)
नोकरी (Job) - आज ऑफिसमध्ये मन लावून काम कराल. तुमचे सहकारीही तुमची प्रशंसा करतील. ज्या महिला कॉस्मेटिक क्षेत्रात आहेत त्यांचा आजचा दिवस खास असेल.
व्यवसाय (Business) - जे मेडिकल क्षेत्रात काम करतायत त्यांनी अनेक नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायात अधिक फायदा मिळेल.
तरुण (Youth) - जे ध्येय गाठण्याचा तुम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होतात तो आज साध्य होईल. त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहाल.
आरोग्य (Health) - ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी आज जरा विशेष काळजी घ्या. आहाराकडे विशेष लक्ष द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :