NPS ते क्रेडीट कार्ड, 1 एप्रिलपासून आर्थिक नियमांमध्ये नेमका काय बदल होणार?
1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरम्यान, 1 एप्रिल पासून आर्थिक व्यवहारातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत.
Financial Rules Changes News: 2023-24 हे आर्थिक वर्ष (financial year) संपावयला अगदी काहीच दिवस शिल्लक आहे. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. दरम्यान, 1 एप्रिल पासून आर्थिक व्यवहारातील अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. जाणून घेऊयात नवीन नियमांबद्दल सविस्तर माहिती.
NPS खात्यातील लॉगिन प्रणालीमध्ये बदल
येत्या 1 एप्रिलपासून NPS खात्यातील लॉगिन प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये NPS (National Pension System) सदस्यांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी त्यांच्या लॉगिन प्रणालीमध्ये बदल केले आहेत. त्यामुळं आता सदस्यांना लॉगिन करण्यासाठी आयडी पासवर्ड तसेच आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर हवा आहे. हा नवीन नियम 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
OLA मनी वॉलेटच्या नियमामध्ये झाले हे बदल
OLA मनी वॉलेटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 एप्रिल 2024 पासून बदलणार आहे.यामध्ये वॉलेट सेवेच्या मर्यादेत वाढ करण्यात आलीय.
येस बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमात बदल
नवीन आर्थिक वर्षात येस बँकेने ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. येस बँकेने देखील आपल्या क्रेडिट कार्डच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या एका तिमाहीत किमान 10000 रुपये खर्चून देशांतर्गत विमानतळावरील लॉजमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. या नवीन नियमाची सुरुवात 1 एप्रिपासून सुरु होणार आहे.
ICICI बँक क्रेडीट कार्ड नियमांमध्ये बदल
ICICI बँकेच्या क्रेडीट कार्ड नियमांमध्ये देखील बदल झाला आहे. ICICI बँकेचं क्रेडीट कार्ड असणाऱ्या नागरिकांना एका तिमाहीत 35000 रुपयापेक्षा जास्त खर्च केल्यास त्यांना एअर पोर्टमधील एअरपोर्ट लॉजमध्ये प्रवेश मिळणार आहे.
SBI च्या क्रेडीट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल झाला आहे. 1 एप्रिलपासून क्रेडिट कार्डवर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट बंद होणार आहेत. त्यामुळं SBI चे क्रेडीट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी आहे.
महत्वाच्या बातम्या: