Senior citizens FD News : दिवसेंदिवस गुंतवणुकीचं (Investment) महत्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भविष्यातील गुंतवणुकीचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक करणं फायद्याचं ठरते. दरम्यान, देशातील ज्येष्ठ नागरिकांना ( senior citizens) समोर ठेऊन बँकांनी अनेक योजना सुरु केल्या आहेत. सर्व एफडी योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना इतरांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याजदर (Interst rate) मिळत आहे. त्यामुळं FD मध्ये केलेली गुंतवणूक ज्येष्ठ नागरिकांना फायद्याची ठरते. दरम्यान, जेष्ठ नागरिकांना ठेवलेल्या मुदत ठेवीच्या माध्यमातून सरकारला देखील मोठा फायदा मिळत आहे. वर्षभरात सरकारनं मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर ज्येष्ठ नागरिकांकडून 27,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे.


FD च्या व्याजातून सरकारची 27,000 कोटी रुपयांची कमाई


जेष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीवर बँका चांगला परतावा देत आहेत. सरकारनं विविध योजना सरु केल्या आहेत. त्याचा मोठा फायदा जेष्ठ नागरिकांना होतोय. दरम्यान, सरकारला देखील जेष्ठ नागरिकांना ठेवलेल्या मुदत ठेवीवरील व्याजाचा मोठा फायदा होत आहे. वर्षभरात या ठेवीतील व्याजातून सरकारची 27,000 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे. त्यामुळं जेष्ठ नागरिकांनी देशाला श्रीमंत केलं आहे. FD मधून जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लादून सरकारनं ही कमाई केली आहे. 


ज्येष्ठ नागरिकांना FD मध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची


ज्येष्ठ नागरिकांना FD मध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते. सर्व बँकांनी FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा मोठा फायदा मिळत आहे. इतरांपेक्षा जेष्ठ नागरिकांना या योजनाचा 0.50 टक्के अधिक फायदा मिळत आहे. त्यामुळं  ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना फायद्याची ठरते. तसेच सरकारला सुद्धा या योजना अधिकचा फायदा मिळवून देत असल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे. 


देशभरात मुदत ठेव खात्यांची संख्या ही 7.4 कोटी 


सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या व्याजावर कर लावून वर्षभरात तब्बल 27 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिलीय. दरम्यान, मुदत ठेवीच्या रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिक मुदत ठेवीत रक्कम गुंतवत असल्याचं चित्र दिसत आहे. वर्षभरात मुदत ठेवींच्या रकमेत 143 टक्क्यांची वाढ झालीय. मुदत ठेवीवर चांगला व्याजदर असल्यानं लोकांमध्ये ही योजना जास्त लोकप्रिय ठरत आहे. सध्या देशभरात मुदत ठेव खात्यांची संख्या ही 7.4 कोटी झाली आहे. यामध्ये 15 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम खात्यात जमी आहे. 


महत्वाच्या बातम्या:


कमी गुंतवणुकीत अधिक नफा! किती वर्षात व्हाल करोडपती? असं करा नियोजन