Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ही लोकांची पसंत बनत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोक या रेल्वेनं (Railway) प्रवास करत आहेत. वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होऊन पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात वंदे भारत एक्सप्रेस विक्रम केला आहे. तब्बल 284 जिल्हे, 24 राज्ये आणि 100 मार्गावरुन वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास सुरु आहे. पाच वर्षात 2 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. आत्तापर्यंत देशात 102 वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. 


वंदे भारतची पहिली ट्रेन ही वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान धावली होती


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 फेब्रुवारी 2019 रोजी वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाली होती. वंदे भारतची पहिली ट्रेन ही वाराणसी ते नवी दिल्ली दरम्यान धावली होती. त्यानंतर हळूहळू या रेल्वेचा मोठा विस्तार झाल्याचं पाहायला मिळालं. 2 कोटीहून अधिक लोकांनी या रेल्वेनं आत्तापर्यंत प्रवास केला आहे. आत्तापर्यंत या रेल्वेनं पृथ्वीच्या 310 फेऱ्यांएवढं अंतर पूर्ण केलं आहे. यावरुनच वंदे भारत या ट्रेनची लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ  असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


देशात 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिली ट्रेन सुरु


दरम्यान, वंदे भारत एक्प्रेस सुरु होऊन पाच वर्ष झाली असली तरी, भारतात पहिली ट्रेन कधी सुरु झाली? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिली ट्रेन सुरु झाली. ही ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान धावली होती. ब्रिटीश राजवटीत ही ट्रेन सुरु झाली होती. आता देशभर भारतीय रेल्वेचं 


महत्वाच्या बातम्या:


Budget 2024: देशात 400 नव्या वंदे भारत गाड्या सुरू होणार! अर्थसंकल्पात होणार पैशाची तरतूद