Vastu Tips : उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेत. त्यामुळे कितीही आपण फ्रिजचा, रेफ्रिजरेटरचा वापर करत असलो तरीही माठाच्या भांड्यातून पाणी (Water) पिण्याची मज्जाच काही वेगळी असते. मुळात माठातलं पाणी प्यायल्याने कोणतीही बाधा होत नाही आणि नैसर्गिक पद्धतीने ते गार होतं त्याचबरोबर पैशांची देखील बचत होते त्यामुळे पूर्वीच्या काळी बरेच लोक माठातलं पाणी प्यायचे. पण, असं असलं तरी आजही बरेच लोक माठातलं पाणी पितात. 

Continues below advertisement

पाणी हे आपल्यासाठी जीवन जरी असलं तरी मात्र वास्तूशास्त्रात (Vastu Tips) प्रत्येक वस्तू एका ठराविक जागेवर, ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते असं म्हणतात. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार, तुम्ही जरी घरातील प्रत्येक गोष्ट त्या त्या जागी ठेवली तर तुम्हाला घरात सकारात्मक बदल दिसून येईल. असाच एक नियम म्हणजे, घरात योग्य त्या ठिकाणी पाण्याची जागा असणे. यामुळे अनेक सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात घडताना दिसतील. 

पाण्याची टाकी 

पाण्याची टाकी ही प्रत्येकाच्या घरी असतेच. पण, वास्तूनुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी कधीच आग्नेय दिशेला ठेवू नये. कारण आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते. असं म्हणतात की अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने वास्तूदोष निर्माण होतात. याचा प्रभाव इतका असतो की यामुळे तुम्हाला आर्थिक तंगी, नकारात्मकता आणि आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तसेच, पाण्याची टाकी, पाण्याची भांडी जसे की, पाण्याचा माठ, कळशी, हंडा हा दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते. 

Continues below advertisement

पाणी ठेवण्याची योग्य जागा कोणती?

वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ईशान्य दिशा ही पाणी ठेवण्याची योग्य दिशा मानली जाते. त्यामुळे पाण्याची टाकी बोअरिंग करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी  उत्तर किंवा ईशान्य दिशा योग्य मानली जाते. पाण्याने भरलेली भांडी ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहे. 

याही गोष्टींची विशेष काळजी घ्या 

वास्तू शास्त्रानुसार, घरातील नळ कधीही गळू देऊ नये. अन्यथा घरात वास्तूदोष निर्माण होतात. घरातील पैसा पाण्यासारखा वाहू लागतो. तसेच, तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकते. यासाठी योग्य वेळी पाण्याचे भांडे गळणार नाही ना याची काळजी घ्या.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shash Rajyog Effect : 2025 पर्यंत 'या' राशी कमावतील बक्कळ पैसा;'शश राजयोगा'मुळे चालून येतील मोठ्या संधी