Gold-Silver Rate : सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,750 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये या मौल्यवान धातूची किंमत 47,520 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. तर चांदी 64100 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 


मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 45750 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत  49680 प्रती 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रती 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर हा 45,750 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 49,900 आहे. नागपूरमध्ये प्रती 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर हा 47,730 तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 49,730 रुपये इतका आहे. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर हा 641 रुपये आहे.


भारतात सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.


महत्त्वाच्या बातम्या: