Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. जिल्ह्यात अजून पाच दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्यानं याचा परिणाम फळ पिकांवर आणि रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांवर होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी उपाय योजना करण्याची गरज आहे. कमी तापमानामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो त्या साठी उपाय योजना महत्वाच्या आहेत . 


उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट आहे. ती अजून पाच दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या पपई आणि केळीच्या बागांची काळजी घेतली पाहिजे. केळींच्या घडांना प्लास्टिक पेपरनं आच्छादन करावं तसेच बागांना रात्रीचं पाणी दिल्यास बागांमधील तापमान नियंत्रित राहतं. तसेच बागांमध्ये शकोटी करावी त्याचा फायदा बागांना होतो. त्याच सोबत होणारे दुष्परिणाम होणार नाहीत. या काळात आपल्या बागांची काळजी घेणं महत्वाचं असल्याचं कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक डॉ. पद्माकर कुंदे यांनी सांगितलं आहे. 


रब्बी हंगामातील पिकांना थंडी पोषक असली तरी तापमान 9 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं. तर त्याचा परिणाम गहू हरभरा आणि रब्बी ज्वारीच्या पिकांवर होत आहे. थंड वातावरणात गहू आणि ज्वारीवर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यासाठी निंबोणी अर्काची फवारणी करावी, त्याचसोबत हरभरा पिकांवर कृषी विद्यापीठानं शिफारस केलेल्या औषधांची फवारणी करण्याचा सल्ला दिला आहे. जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम मानवी जनजीवनावर होत आहे, तसा रब्बी हंगामाच्या पिकांवर देखील होणार असल्यानं योग्य काळजी घेणं महत्वाचं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा