एक्स्प्लोर

EPS Pension Hike: खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, केंद्राची किमान पेन्शनची रक्कम 3000 रुपये करण्याची तयारी

EPS Pension Hike: सरकारकडून EPS  अंतर्गत मिळणाऱ्या ईपीएस पेन्शनची रक्कम ₹1,000 वरुन वाढवून ₹3,000 करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. याचा फायदा 36.6 लाख पेन्शनधारकांना होऊ शकतो. 

EPS Pension Hike नवी दिल्ली : केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच ईपीएसनुसार दिल्या जाणाऱ्या किमान पेन्शनची रक्कम 1000 रुपयांवरुन 3000 रुपये करण्यावर विचार करत आहे. एका वरिष्ठ  सरकारी अधिकाऱ्यानं मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भातील निर्णय येत्या काही महिन्यांमध्ये होऊ शकतो. यासंदर्भातील मागणी गेल्या काही काळापासून होत आहे, वाढत्या महागाई आणि पेन्शनधारकांच्या सामाजिक सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असताना सरकार दिलासा देणारा निर्णय घेणार का याकडे लक्ष लागलंय.

EPS  म्हणजे काय?

ईपीएस ही भारतात संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना आहे. ही ईपीएफओकडून चालवली जाते. या द्वारे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ठराविक रक्कम दरमहा मिळते. या योजनेतील योगदान कर्मचारी ज्या आस्थापनेत काम करतो त्यांच्याकडून दिलं जातं. मूळ वेतनाच्या ईपीएसमध्ये 8.33 टक्के रक्कम जमा केली जाते. तर,3.67 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते.  

शासकीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार किमान पेन्शन रक्कम 3000 रुपये दरमहा करण्यासंदर्भात तयारी करत आहोत. बऱ्याच काळापासून हे प्रलंबित होतं यापूर्वी 2020 मध्ये श्रम मंत्रालयानं वित्त मंत्रालयाला दरमहा पेन्शन 2000 रुपये करण्यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता. मात्र, तो मंजूर झाला नव्हता.  

7500 रुपये पेन्शनची मागणी

ईपीएस निवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट किमान पेन्शन रक्कम 7500 करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना कोणतंही आश्वासन दिलं गेलं नव्हतं.  ईपीएस पेन्शनचा लाभ सध्या 36.6 लाख लोकांना दरमहा 1000 रुपये मिळतो.  

आर्थिक परिणामांवर विचार सुरु

श्रम मंत्रालयानं 3000 रुपये किमान पेन्शन  करण्यासंदर्भात किती रुपये खर्च येईल या संदर्भातील अंदाज घेतला जात आहे.  आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये श्रम मंत्रालयानं  पेन्शनधारकांना 1000 रुपयांप्रमाणं किमान पेन्शन देण्यासाठी 1223 कोटी रुपये खर्च केले होते.  2022-3 मध्ये ही रक्कम 970 कोटी रुपये होती.   केंद्र सरकार सप्टेंबर 2014 पासून किमान पेन्शन 1000 रुपयांप्रमाणं देण्यासाठी अनुदान देते. म्हणजेच एखाद्या पेन्शनधारकाला मिळणारी पेन्शन 1000 रुपयांपेक्षा कमी असेल तर ती कमी असलेली रक्कम केंद्राकडून दिली जाते.  
 
भाजप खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या संसदीय समितीनं श्रम मंत्रालयाला  ईपीएस पेन्शन  रक्कम तात्काळ वाढवण्याची शिफारस केली होती. महागाई वेगानं वाढत असल्याचं कारण त्यांनी दिलं होतं.

इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
Kalind Limited : 15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
Focused Mutual Funds : बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
बाजारापेक्षा जास्त परतावा हवाय? 'फोकस्ड म्युच्युअल फंड' ठरू शकतात उत्तम पर्याय; जाणून घ्या फायदे आणि जोखीम
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget