EPFO Pensioners Life Certificate Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) संघटनेनं आपल्या पेन्शनधारकांसाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे. आता पेन्शनधारकांना हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करण्याची चिंता करावी लागणार नाही. पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार हयातीचा दाखला जमा करु शकतात. ईपीएफओनं हयातीचा दाखला सादर करण्याची अंतिम मुदत काढून टाकली आहे. दरम्यान, तुम्ही एकदा हयातीचा दाखला सबमिट केल्यानंतर तो 1 वर्षासाठी वैध असतो. मात्र एक वर्ष उलटून गेल्यानंतर पुन्हा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. 


पेन्शनधारकांना दिलासा 


सन 2019 पर्यंत प्रत्येक पेन्शनधारकाला नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला सादर करणं अनिवार्य होतं. मात्र डिसेंबरमध्ये हा नियम बदलण्यात आला. आता पेन्शनधारक त्यांच्या सोयीनुसार, हयातीचा दाखला सादर करु शकतात. त्यामुळे अनेक पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे. 



EPFO ची ट्वीट करत माहिती 


ईपीएफओनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करून या संदर्भातील माहिती पेन्शनधारकांना दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये, EPFO ​नं म्हटलं आहे की, 'EPS'95 पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार, हयातीचा दाखला सादर करू शकतात. जे सादर केल्याच्या तारखेपासून 1 वर्षांसाठी वैध असेल.


जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 'ही' कागदपत्रं आवश्यक 



  • पीपीओ (PPO) क्रमांक

  • आधार (Aadhar Number) क्रमांक

  • बँक खाते क्रमांक

  • आधार लिंक केलेला नंबर


हयातीचा दाखला कसा सादर कराल? 


ईपीएफओने ट्वीटमध्ये पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याच्या पद्धतीबद्दलही माहिती दिली आहे. EPFO नं सांगितलं की, पेन्शनधारक कोणत्याही सार्वजनिक सेवा केंद्र (CSC), पोस्ट ऑफिस, जवळचे EPFO ​​कार्यालय, UMANG अॅप किंवा पेन्शन भरणाऱ्या बँकेला भेट देऊन त्यांचा हयातीचा दाखला सादर करू शकतात.


महत्त्वाच्या इतर बातम्या :