Horoscope Today. April 26, 2022 : आज सूर्योदयाच्या वेळी चंद्र शतभिषा नक्षत्र आणि कुंभ राशीत आहे. गुरू मीन राशीत आहे आणि सूर्य मंगळाच्या वर्चस्वात आहे. उर्वरित ग्रहांची स्थिती तशीच राहील. मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांना आज जपून खर्च करण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घ्या आजचे राशीभविष्य...
मेष (Aries Horoscope) : आज तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, गरजेपेक्षा जास्त खर्च होऊ शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूकीचे नियोजन करावे. क्षणिक राग टाळा, क्षणिक राग आजाराचे कारण बनेल. आरोग्याबाबत काहीसा तणाव राहील.
वृषभ (Taurus Horoscope) : आज तुम्हाला भविष्यातील कामाचे नियोजन करावे लागेल. चांगल्या कामात थोडा वेळ घालवला, तर तुमच्यात बरेच सकारात्मक बदल घडू शकतात. खर्चात काहीशी वाढ होईल. शत्रूंवर सहज विजय मिळवाल. आज तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आनंदी राहाल. अध्यात्माच्या दिशेने झुकाव वाढेल. घाईगडबडीत कोणतेही काम केल्यास, त्यात काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini Horoscope) : नोकरीच्या ठिकाणी कामात कोणतीही निष्काळजीपणा करू नका. व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे सावध रहा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ते तुमच्याशी काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतील. वाहन आणि घर खरेदी करण्याची योजना मनात तयार होईल. भविष्याच्या दृष्टीने खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
कर्क (Cancer Horoscope) : आज तुमचा आत्मविश्वास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. चैनीच्या वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना चांगली संधी आहे, ते चांगला नफा कमवू शकतात. शिक्षणाशी संबंधित प्रवास घडण्याची शक्यता आहे. अवास्तव खर्चामुळे जमा असलेले पैसे कमी होऊ शकतात. मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कोणतीही गाडी चालवताना जास्त काळजी घ्या.
सिंह (Leo Horoscope) : आजचा दिवस आनंदात जाईल. कार्यशैलीत काही बदल होण्याची शक्यता आहे. आज गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरीत अधिकाऱ्यांसोबत अनावश्यक वाद टाळा. कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आरोग्याशी संबंधित जुनाट समस्या पुन्हा डोकं वर काढू शकतात.
कन्या (Virgo Horoscope) : आजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. व्यवसायात यश मिळेल. कुटुंबात धार्मिक कार्यांचे आयोजन होईल. जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते, त्यांची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा. अतिरिक्त खर्चामुळे तुम्ही काहीसे त्रस्त व्हाल. उत्पन्नाची स्थिती सुधारेल. कुटुंबातील ज्येष्ठांनी तुम्हाला काही सल्ला दिला, तर त्याचे अवश्य पालन करा.
तूळ (Libra Horoscope) : आजचा दिवस काहीसा गडबड गोंधळाचा असणार आहे. तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास ती मान्य करा. व्यवसायात आत्ताच नवीन भागीदार बनवण्याची गरज नाही, काही काळानंतर याचा विचार करावा. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करेल. मात्र, अशा प्रसंगी वाद घालणे टाळा. वादात पडल्यास तुमचे काही काम बिघडू शकते.
वृश्चिक (Scorpio Horoscope) : आज तुम्हाला काही काळ विश्रांती घेण्याची गरज आहे. कामाचा ताण घेण्याची गरज नाही. जोडीदाराच्या मदतीने एखादे मोठे काम पूर्ण कराल आणि त्याचा नक्कीच फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यात थोडा वेळ घालवाल. जुन्या मित्रांशी भेट होऊ शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Horoscope) : आज कोणताही निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. दुसऱ्याने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. परदेश प्रवासाचे योगही येणार आहेत. हा प्रवास लाभदायक ठरेल. व्यवसाय नवीन करार होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. बढतीचा विचार करत असाल, तर काही काळ वाट पाहावी लागेल.
मकर (Capricorn Horoscope) : कामात निष्काळजीपणा करून नका. आज धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. कुटुंबातील सदस्यही आनंदी राहतील. कोणाशीही वाद घालणे टाळा, अन्यथा ते त्रासदायक ठरेल. मित्राच्या मदतीने व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. लाभाच्या संधीही चालून येतील. आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींवर लक्ष द्या. वागण्यात आणि बोलण्यात संयम बाळगा.
कुंभ (Aquarius Horoscope) : नोकरीच्या ठिकाणी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. आरोग्याबाबत सावध राहा. राग आणि आळसावर नियंत्रण ठेवा. मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधताना शब्द काळजीपूर्वक वापरा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. शक्यतो प्रवास करणे टाळा.
मीन (Pisces Horoscope) : वडिलोपार्जित संपत्तीवरून वाद निर्माण होऊ शकतात. आज तुमची विचार केलेली कामे सहज पूर्ण होतील, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. बुद्धीचा वापर करून समस्या सोडवाव्या लागतील. वसायात लाभाच्या संधी मिळत राहतील, यामुळे आर्थिक स्थितीत सुधार होईल. नकारात्मक बोलणे टाळावे. थकवा आणि अशक्तपणा वाटू शकतो, यावर मात करण्यासाठी योगाची मदत घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :