PF Account Balance Check:  देशात मोठ्या संख्येने लोक संघटीत क्षेत्रात काम करत आहेत. सरकारी, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांच्या पगारातील एक भाग भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO)मध्ये  जमा होत असतो. अशातच पीएफमध्ये जमा होणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.  कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा आपात्कालीन स्थितीत खातेदाराचा वारस अथवा खातेदार पीएफमधून पैसे काढू शकतो. 


पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यात किती रक्कम झाली याबाबतची माहिती काही ठाराविक दिवसांच्या अंतराने दिली जाते. पीएफमध्ये किती रक्कम आहे, याची माहिती ईपीएफओच्या संकेतस्थळावर पाहता येऊ शकते. अनेकदा इंटरनेटच्या कमकुवत नेटवर्कमुळे ईपीएफचे संकेतस्थळ लॉगिन करण्यात अडचणी येतात. अशावेळी तुम्ही एसएमएस अथवा मिस्ड कॉलची मदत घेऊ शकता. त्यासाठी तुमच्या पीएफ खात्यात तुमचा मोबाइल क्रमांक नोंदणी केलेला असणे गरजेचा आहे. 


एसएमएसने जाणून घ्या बचतीची रक्कम


एसएमएसद्वारे तुम्ही ईपीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी  EPFO UAN LAN (ज्या भाषेत माहिती हवी ती भाषा) टाइप करावे आणि 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवावा. इंग्रजी भाषेत माहिती मिळवण्यासाठी ENG, हिंदीसाठी HIN या शब्दाचा वापर करू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर दोन ते तीन मिनिटात तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल. 


मिस्ड कॉलद्वारे मिळू शकेल माहिती


मिस्ड कॉलद्वारे तुम्हाला पीएफ खात्यातील बचतीची माहिती मिळू शकेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीबाबतची माहिती दिली जाईल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: