EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) शी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. लवकरच EPFO ची सॅलरी लिमिट 15000 रुपयांवरून 21000 रुपये दरमहा केली जाण्याची शक्यता आहे. वेतन मर्यादेत वाढ करण्याचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीनं सरकारकडे दिला आहे. यामुळे अनेक संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि किमान 75 लाख कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत अधिक सामील होऊ शकतील.
तसेच, हे कर्मचारी ईपीएफओच्या नवीन योजनांचा लाभ घेऊ शकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर सरकारनं समितीच्या अहवालाला मान्यता दिली तर त्याची अंमलबजावणी मागील तारखेपासून केली जाऊ शकते. याचा लाभ अनेक नोकरदारांना मिळू शकतो.
2014 मध्ये EPFO पगार मर्यादा वाढवण्यात आली होती
यापूर्वी 2014 मध्ये EPFO ची पगार मर्यादा वाढवण्यात आली होती. 2014 पूर्वी ही मर्यादा 6,500 रुपये होती जी नंतर 15,000 रुपये करण्यात आली. ही मर्यादा वाढवूनही अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. आता त्याची मर्यादा 15,000 रुपयांवरून 21,000 पर्यंत वाढवण्याचा विचार केला जात आहे. इकोनॉमिक टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की, जर ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं समितीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी केली तर अशा परिस्थितीत महागाईच्या या युगात लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होईल.
कंपन्यांचं काय म्हणणं?
या प्रस्तावाबाबत एका कंपनीनं बोलताना सांगितलं की, कोरोना महामारीमुळे कंपन्या आधीच खूप दबावाखाली काम करत आहेत. महामारीमुळे कंपनीच्या बॅलेन्स शीटवर खूप ताण आला आहे. अशा स्थितीत सरकारनं या प्रस्तावाची योग्यवेळी अंमलबजावणी करावी. त्याचबरोबर सरकारवरीलही बोजा खूप वाढणार आहे. सध्याच्या परिस्थितीत, सरकार दर वर्षी पेन्शन योजनेवर म्हणजेच, EPFO वर दरवर्षी सुमारे 6,750 रुपये खर्च करते. समितीच्या शिफारशी लागू केल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
इंटरनेटशिवाय कसा चेक कराल PF ची रक्कम?
एसएमएसने जाणून घ्या बचतीची रक्कम
एसएमएसद्वारे तुम्ही ईपीएफ खात्यातील रक्कम जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यासाठी EPFO UAN LAN (ज्या भाषेत माहिती हवी ती भाषा) टाइप करावे आणि 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवावा. इंग्रजी भाषेत माहिती मिळवण्यासाठी ENG, हिंदीसाठी HIN या शब्दाचा वापर करू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर दोन ते तीन मिनिटात तुम्हाला पीएफ खात्यातील रक्कमेची माहिती मिळेल.
मिस्ड कॉलद्वारे मिळू शकेल माहिती
मिस्ड कॉलद्वारे तुम्हाला पीएफ खात्यातील बचतीची माहिती मिळू शकेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 011-22901406 मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या बचतीबाबतची माहिती दिली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- EPFO: घरातूनच इंटरनेटशिवाय पाहू शकता तुमच्या PF मधील रक्कम, जाणून घ्या प्रक्रिया
- GST : जीएसटीतून 5 टक्के कराचा टप्पा वगळला जाणार? GST परिषदेत 'हे' निर्णय होण्याची शक्यता
- Upcoming IPO: पैसे कमावण्याची नामी संधी! या दोन कंपन्यांचे येत आहेत आयपीओ
- Post Office : पोस्ट ऑफिसमध्ये फक्त 100 रुपयांत खातं एक; फायदे मात्र अनेक, जाणून घ्या