एक्स्प्लोर

EPFO : पीएफ खात्यातील पैसे ATM मधून कधीपासून काढता येणार? पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, नवी अपडेट समोर

EPFO : पीएफमधून पैसे काढण्यासंदर्भात नवी सुविधा लवकरच सुरु होणार आहे. ईपीएफओ खात्यातून यूपीआय आणि एटीएमद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

EPFO नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. एटीएम आणि यूपीआय खात्यातून पैसे काढण्यासाठीची सुविधा सुरु होण्यासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार पीएफ खातेदारांना एटीएम आणि यूपीआयद्वारे पैसे पीएफ खात्यातून काढता येतील. ही सुविधा मे 2026 च्या अखेरपासून सुरु होण्याची शक्यता आहे.

पीएफ खात्यातील रक्कम ATM मधून कधीपासून काढता येणार?  

ईटी नॉऊच्या रिपोर्टनुसार ही सुविधा ईपीएफओ 3.0 अपडेटचा भाग आहे. याचा उद्देश कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या डिजीटल यंत्रणेला अद्ययावत करणे आणि पीएफची प्रक्रिया वेगवान करण्याचा भाग आहे.  नव्या सिस्टीमनुसार ईपीएफओकडून नव्यानं एटीएम कार्ड जारी केलं जाऊ शकतं. यूजर्स कोणत्याही कागदपत्रांशिवा पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. ईपीएफओ 3.0 प्रक्रिया 2026 च्या मध्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. त्यानंतर क्लेम सेटलमेंट, खाते ट्रान्सफर आणि चांगल्या डिजीटल सेवा मिळतील. 

रिपोर्टनुसार एटीएम आणि यूपीआयद्वारे पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास पीएफ खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम काढता येईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते डिटेल्स, आयएफएससी कोडशी लिंक असलेला यूएएन क्रमांक आवश्यक आहे. 

ईपीएफओनं आर्थिक वर्ष 2026 मध्ये 8.31 कोटी क्लेम सेटल केले आहेत. 2025 च्या तुलनेत 2025-26 मध्ये ईपीएफओनं मोठ्या संख्येनं पीएफ क्लेम मंजूर करण्यात आले आहेत. ईपीएएफओ 3.0 नुसार अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. ज्यात यूपीआय बेस्ड पीएफ काढणे, ईपीएफ सदस्यांना डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढण्यास मंजुरी मिळेल. नव्या अपडेशननंतर ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज पीएफ खातेदारांना राहणार नाही. अद्याप सरकारकडून ईपीएफओ 3.0 लाँच करण्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

 ईपीएफओकडून गेल्या काही दिवसांपासून पीएफ खात्यातून रक्कम काढण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.  पीएफ खात्यातून काही रक्कम काढायची असल्यास चेक अपलोड करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. याशिवाय क्लेम मंजूर करण्यासाठी ऑटो अप्रूव्हल प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामुळं क्लेम मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ यामुळं कमी झाला आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget