एक्स्प्लोर

IPO Update : 89 पट सबस्क्राइब झालेल्या EIE च्या आयपीओचा शेअर 200 रुपयांचा टप्पा पार करणार? GMP कितीवर?

Enviro Infra Engineers IPO : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ उद्या लिस्ट होणार आहे. या कंपनीनं एका शेअरची किंमत 148 रुपये निश्चित केली आहे. 

मुंबई : एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ उद्या लिस्ट होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कंपनीच्या आयपीओला 89 पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीचा आयपीओ 29 नोव्हेंबरला बाजारात लिस्ट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कंपनीच्या आयपीओला ग्रे मार्केट प्रीमियमवर 39 टक्के ट्रेड दाखवत आहे. जीएमपीनुसार आयपीओ लिस्ट झाल्यास गुंतवणूकदारांना  फायदा होणार आहे. 

200 रुपयांवर शेअर लिस्ट होणार?

एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीच्या आयपीओ शेअरची किंमत 148 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओचा जीएमपी 39 टक्के म्हणजेच प्रति शेअर 57 रुपये दाखवत आहे. यानुसार आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होत असताना 205  रुपयांना लिस्ट होऊ शकतो. ज्यांना आयपीओ अलॉट झाला आहे त्यांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

 एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सचा आयपीओ 89.90 पट सबस्क्राइब झाला आहे. कंपनीनं निश्चित केल्या प्रमाणं एका लॉटमध्ये 101 शेअर आहेत. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओ अलॉट झाला आहे त्यांच्या खात्यात 101 शेअर क्रेडिट करण्यात आले आहेत. जीएमपीनुसार एका शेअरला 57  रुपये अधिक मिळाल्यास एका लॉटमागं गुंतवणूकदारांना 5700 रुपयांपर्यंत परतावा मिळू शकेल. एनवायरो इन्फ्रा इंजिनिअर्सच्या आयपीओद्वारे 3,07,93,600 शेअर जारी केले जाणार आहेत अशी माहिती आहे. त्यापैकी 2,76,83,13,747 शेअरसाठी बोली लागली आहे. 


पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून या आयपीओला 157.05 पट सबस्क्राइब करण्यात अलं आहे. गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून देखील 153.80 पट बोली लावण्यात आली आहे.  रिटेल गुंतवणूकदारांकडून 24.48 पट सब्सक्राइब करण्यात आलं आहे. एनवायरो  इन्फ्रा इंजिनिअर्स कंपनीनं अँकर इनवेस्टर्सकडून 195 कोटी रुपये उभारले आहेत. आयपीओच्या माध्यमातून 650 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न आहे. कंपनीनं आयपीओद्वारे 3 कोटी 87 लाख इ्क्विटी शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर प्रवर्तकांकडून 52.68 लाख शेअरच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढली आहे. गुंतवणूकदारांनी मोठ्या कंपन्यांच्या आयपीओकडे मात्र पाठ फिरवल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. 

इतर बातम्या :

Multibagger Stocks :6 महिन्यात 500 टक्के परतावा, 11 रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकनं गुंतवणूकदार मालामाल, सध्या शेअर किती रुपयांवर?

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget