आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर ED ची मोठी कारवाई, 800 कोटींची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) हैदराबाद युनिटने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे.

Jagan Mohan Reddy Money Laundering Case : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) हैदराबाद युनिटने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. जगन मोहन रेड्डी यांची 27.5 कोटी रुपयांची शेअर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यासोबतच दालमिया सिमेंट्स भारत लिमिटेड (DCBL) ची 377.2 कोटी रुपयांची जमीनही जप्त करण्यात आली आहे. ही बाब 'क्विड प्रो क्वो' गुंतवणुकीशी संबंधित आहे.
जुन्या प्रकरणाच्या आधारे ईडीने केली कारवाई
DCBL ने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 793.3 कोटी रुपये आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर 14 वर्षांनी ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) 2011 मध्ये नोंदवलेल्या जुन्या प्रकरणाच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे. त्या प्रकरणात डीसीबीएलने भारती सिमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक केली होती. जगन मोहन रेड्डी यांचे कार्मेल एशिया होल्डिंग्स लिमिटेड, सरस्वती पॉवर अँड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि हर्षा फर्ममधील शेअर्स जप्त करण्यात आले आहेत. DCBL ला हा जप्तीचा आदेश 15 एप्रिल 2025 रोजी मिळाला होता, तर 31 मार्च रोजीच हा आदेश जारी करण्यात आला होता. जमिनीची प्रारंभिक खरेदी किंमत 377 कोटी रुपये होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये सीबीआयने वाय.एस. जगन मोहन रेड्डी, डीसीबीएल आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर भारतीय कायदे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित नियमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणात ईश्वर सिमेंट्सची खाण जमीन DCBL कडे हस्तांतरित केल्याचाही समावेश आहे. तपास यंत्रणांचे म्हणणे आहे की जगन रेड्डी, त्याचे जवळचे सहकारी व्ही. विजया साई रेड्डी (जे ऑडिटर आणि माजी खासदार आहेत) आणि DCBL चे पुनित दालमिया यांनी रघुराम सिमेंट लिमिटेडमधील त्यांचे शेअर्स PARFICIM या फ्रेंच कंपनीला विकण्याचा करार केला होता. हा सौदा 135 कोटी रुपयांना झाला होता. यातील 55 कोटी रुपये जगन रेड्डी यांना हवालाद्वारे रोख स्वरूपात देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे व्यवहार 16 मे 2010 ते 13 जून 2011 दरम्यान झाले. दिल्लीत जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांवरून आयकर विभागाला या पैशांची माहिती मिळाली.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी : सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का, ईडीकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु























