एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Microsoft Satya Nadella Meet: मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक, AI हब, 45 हजार लोकांना रोजगार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Microsoft Satya Nadella Meet: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची आज मुंबईत बैठक झाली.

Devendra Fadnavis Microsoft Satya Nadella Meet मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला (Microsoft Satya Nadella) यांची आज मुंबईत बैठक झाली. मायक्रोसॉफ्टकडून मुंबईत मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस आणि सत्या नडेला यांच्यात चर्चा झाली.  आजच्या या बैठकीसाठी हिवाळी अधिवेशन सोडून देवेंद्र फडणवीस तातडीने मुंबई पोहोचले होते. 

मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत माहिती दिली. मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्टसोबत GCC Global Capability Centers (ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर) हा महत्वकांशी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. 20 लाख स्क्वेअर फुटांची जीसीसी महाराष्ट्रात उभारण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis Microsoft Satya Nadella Meet)

45 हजार लोकांना मिळणार रोजगार- (Maharashtra Goverment Deal With Microsoft)

45 हजार लोकांना जीसीसीद्वारे रोजगार उपलब्ध होतील. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राला एआय हब करण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. बैठकीत प्राईम AI OS ची चित्रफीत दाखवली. इतर क्षेत्रात AI कसा वापर करता येईल त्यांसदर्भात चर्चा झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. 

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार (Microsoft Invest In India)

मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. अमेरिकन टेक कंपनीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल. या निधीचा वापर AI, क्लाउड आणि डेटा सेंटर यांसारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी केला जाईल. भारताच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट 1.57 लाख कोटी गुंतवत आहे. ही आशियातील आमची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. यामुळे भारतात AI साठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण होतील, लाखो लोकांना नवीन कौशल्ये शिकवली जातील आणि आपला डेटा आपल्याकडे सुरक्षित ठेवण्याची ताकदही मिळेल. भारताच्या AI-युक्त भविष्यासाठी हेच हवे होते, असं सत्या नडेला यांनी सांगितले. 

संबंधित बातमी:

राज्य सरकार आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये मोठा करार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करारासाठी मुंबईत दाखल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती

Embed widget