Davos World Economic Forum Meeting : दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीचा महाराष्ट्राला मोठा फायदा होत असल्याचं दिसून येतयं.  पहिल्या दिवसाच्या सामांजस्य करारातून राज्याला 3 लाख 82 हजार 500 कोटींची गुंतवणूक मिळाली आहे. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू ग्रुपकडून 3 लाख कोटींची गुंतवणूक करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून त्या जिल्ह्यात जवळपास 10 हजार रोजगार निर्मिती शक्य होणार आहे. 

गडचिरोलीत स्टील, रिन्युएबल एनर्जी, इन्फ्रा आणि सिमेंट, लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भात गुंतवणूक येणार आहे. सोबतच राज्यात वारे एनर्जी या हरित ऊर्जा कंपनीकडून 30 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून 7 हजार 500 जणांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच टेम्बो कंपनीची देखील 1 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 300 जणांना रोजगार मिळणार मिळणार आहे. 

दावोसमध्ये आतापर्यंत झालेले सामंजस्य करार

एकूण : 4 लाख 60 हजार कोटींचे

1) कल्याणी समूह

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्हीगुंतवणूक : 5200 कोटीरोजगार : 4000 कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षणगुंतवणूक : 16,500 कोटीरोजगार : 2450कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्सगुंतवणूक : 17,000 कोटीरोजगार : 3200कोणत्या भागात :

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्सगुंतवणूक : 12,000 कोटीरोजगार : 3500कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेयेगुंतवणूक : 750 कोटीरोजगार : 35कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्सगुंतवणूक : 3,00,000 कोटीरोजगार : 10,000कोणत्या भागात : गडचिरोली

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणेगुंतवणूक : 30,000 कोटीरोजगार : 7500कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षणगुंतवणूक : 1000 कोटी रोजगार : 300कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधागुंतवणूक : 2000 कोटीरोजगार : 5000कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञानगुंतवणूक : 25,000 कोटीरोजगार : 1000कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्सगुंतवणूक : 25,000 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्सगुंतवणूक : 10,521 कोटीरोजगार : 5000कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्सगुंतवणूक : 4000 कोटीरोजगार : 500कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेयेगुंतवणूक : 250 कोटीरोजगार : 600कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जागुंतवणूक : 10,750 कोटीरोजगार : 1850कोणत्या भागात : पुणे

ही बातमी वाचा: